पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९१


पक्षी, बेडूक ह्यांची चालचलणूक मी बारकाईनें पहात असें; लोकांस जें माहीत नसे, किंवा लोकांस ज्याचें महत्व वाटत नसे अशा पुष्कळ गोष्टी विचारून मी लोकांस भंडावून टाकीत असें."
 लॉक आपल्या शिक्षणावरील निबंधांत ह्मणतो- “शिक्षणाब-द्दल मी एकच गोष्ट सांगतों ती हीः - 'पुस्तकाशी संलाप' करणें ( मग हा प्रयोग कसाका प्रचारांत आला असेना ) हा माझ्या मतें शिक्षणाचा मुख्य भाग नव्हे. त्याला आणखी दोन भाग जोडून दिले पाहिजेत. त्यांपैकीं प्रत्येक ज्ञान वाढविण्याच्या काम शक्त्यनुसार मदत करितो. हे दोन भाग मनन व वाद- विवाद होत. वाचन कच्चीं द्रव्यें गोळा करण्यासारखें आहे. त्यांत बरीच टाकाऊ बाजूस काढावी लागतात. मनन सामा- नाची निवड करणें तें मोजणें मापणें, लांकूड घडणें, त्यांचे चौरस पाडणें, दगड घडविणें, व घर बांधणें ह्यासारखें आहे; व मित्रांबरोबर त्याविषयीं वादविवाद करणें, ( कारण वितं- डवाद निरुपयोगी असतो. ) घर तपासून पहाणें, खोल्यांत फिरणें, बांधणी पक्की कोठे झाली आहे, कच्ची कोठें राहिली आहे हें पहाणें, व व्यंग असेल तेथें दुरुस्ती करण्याचा उत्तम मार्ग शोधून काढणें ह्यासारखें आहे. आणखी वादविवादाच्या यो- गानें नवीन शोध लागतात. दोन्ही उपायांनीं जसें ज्ञान मनांत बिंबत नाही, तसें ह्यानें बिंबतें."