पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९०

मीं नुक्तींच सांगितलीं तीं होत. जिवांत जीव आहे तोपर्यंत आपण शिकतच असतों, हें खरें. जुनी ह्मणही तशीच आहे;“प्राण धारण करा व शिका." पण कादंबरींतून अथवा वर्तमान- पत्रांतून जें तुटक ज्ञान मिळतें तें कसेंबसें आपण मिळवितों; किंवा स्वशिक्षण व ज्ञान असें ज्याला बिनदिक्कत ह्मणतां येईल तें आपण मिळवितों हा मात्र प्रश्न राहिला आहे.
 संसारसुखांत शिक्षण वाजवी रीतीनें कसें असावें ह्याबद्दल एका अधिकारी माणसाचे विचार दिलेले आहेत; व ह्या ठिकाणी- ही प्रो० हक्स्लेच्या त्याच विचारांचा उतारा देतों:-
 "खऱ्या शिक्षणाच्या योगानें साधारण बुद्धीचा मुलगा १५/१६ व्या वर्षी आपली भाषा सौकर्यानें, व शुद्ध रीतीनें वाचण्यास व लिहिण्यास तयार व्हावा; जुने श्रेष्ठ ठरलेले ग्रंथकारांचा अभ्यास करून भाषेचा गुणोत्कर्ष कळण्याची ग्राहकशक्ति त्याला यावी; आपल्या देशाच्या इतिहासाची सर्वसाधारण माहिती असावी; समाजास नियमित करणारे नियम कळूं लागावेत; पदार्थ- विज्ञानशास्त्र व मानसिकशास्त्र ह्यांची मूलतत्वें माहीत असावी; साधें गणित व भूमिति ह्यांचें साधारण ज्ञान असावें; तर्काचें ज्ञान नियमबद्ध नको, पण उदाहरणावरून झालेलें असावें; गायनकलेचीं मूलतत्वें व चित्रकलेचें ज्ञान धड्यासारखें न वाटतां करमणूक ह्मणून मिळवून घेतलेलें असावें. "
 ही माहिती फार रंजविणारी आहे. शारीरशास्त्रांत मोठा प्रवीण जो जॉन हन्टर त्याच्या सारखाच बहुतेकांचा अनुभव असेल, व त्याच्या सारखेंच बहुतेकांस बोलतां येईल. “मी लहान मुलगा असतांनाच ढग व निरनिराळ्या जातींचें गवत, ह्याविषयीं मला माहिती पाहिजे होती. हिंवाळ्यांत पानांचा रंग कां बदलतो ह्याचें कारण मला पाहिजे होतें. मुंग्या, माश्या,