पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८९

वेळीं त्याचप्रमाणें लढाईच्या वेळीं, करण्यास ज्याच्या योगानें मनुष्य लायक होतो त्यालाच मी पूर्ण व उदात्त शिक्षण ह्मणतों."
 शब्दांच्या प्रयोगावरून गोष्टींचा निकाल लावितां येतो असें मानण्यास तत्वज्ञान्यांची नेहमीं विशेष तयारी असते. प्लुतार्कनें ह्याबद्दल एक हास्यकारक वादविवाद लिहिला आहे; तो हा-प- हिल्यानें कोणाची उत्पत्ति ? कोंबडीची कीं अंड्याची ? ह्याबद्दल एक असा विचार झाला : कोंबडी पहिल्यानें उत्पन्न झाली; कारण, बोलतांना आपण कोंबडीची अंडी असा प्रयोग करितों, अंड्याची कोंबडी असा करित नाहीं.
 “खऱ्या शिल्प्याला ज्या अवर्णनीय चातुर्यानें, खडक, झाडें- झुडपें, सरोवरें, पर्वत इत्यादींमध्यें ईश्वरी सौंदर्याचा अंश दिसतो, तें चातुर्य कळण्याची योग्यता अंगी नसावी, अशा रीतीनें मुलांस वाढविणें हें बरोबर नाहीं."
 जेफरीज ह्मणतो- “ बऱ्याच पुस्तकांत तुह्मांला नवीन विचार सांपडतील अशी जर तुमची कल्पना असली तर तुमची निराशा होईल. झरे, समुद्र, पर्वत, अरण्यें, सूर्यप्रकाश, अनिरुद्ध संचार करणारा वायु, ह्यांच्या ठायीं विचारांचें वास्तव्य असतें." झरे, स- मुद्र, पर्वत, अरण्यें, सूर्यप्रकाश, वायु, ह्यांच्याशी आपला जितका सहवास व्हावासें आपणांस वाटतें तितका होत नाहीं. तथापि, पुस्तकांत देखील विचार भरलेले आहेतच. परंतु निवड करून त्यांचा उपयोग केला पाहिजे. विचारांचा स्फोट होण्यास भाषा कच्चें साधन होय. प्रत्येक मुलगा मोठा होतो असें नाहीं. ग- णितांतले सिद्धांत देखील सावधगिरीनें वापरले पाहिजेत.

 शाळा सुटल्यावर पद्धतशीर शिक्षण चालू ठेवण्याचें पुष्कळांस होत नाहीं, त्याचें कारण सध्यांच्या शिक्षणपद्धतींतलीं जीं व्यंगें


१ व्हिटिअर.