पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८८

थोडें येत होतें हें आपणास माहीत आहे. मनन व वादविवाद ह्यापासून पुस्तकी ज्ञानाला कितीही मदत झाली, तरी पुस्तकी ज्ञान शिक्षणाचा एकच भाग आपणांस साध्य करून देतें. ज्या मुलानें केवळ पुस्तकी विद्या साध्य करून घेतली, ज्याला सृष्टीचें ज्ञान काडीचें नाहीं, ज्या जगांत आपण रहातों त्याची ज्याला मुळींच माहिती नाहीं, तो वयांत आला तरी पक्का होत नाहीं. तो अर्धवटच.
 “रोपे वाढावेत ह्मणून फुलांच्या ताटव्याजवळ जाऊन वन स्पतिशास्त्राचें पुस्तक वाचून दाखवावें" ह्या प्रकारेंच आपलें बहु- तेक ज्ञान आहे असें एकानें ह्मटलें आहे, तें खरें आहे.
 आह्मांस पुष्कळ शिकले पाहिजे इतकेंच नव्हे तर पुष्कळ विसरलें पाहिजे. असें बोलतों ह्मणून मी शिक्षकांचे उपकार वि- सरतों असें खरोखरी नाहीं. त्यांचा धंदा फार कंटाळवाणा, थक- विणारा, व जबाबदारीचा आहे. मुलांबरोबर खेळण्यासारखें दुसरें आनंदकारक काम नाहीं, पण त्यांस शिकविणें त्रासदायक असतें.
 व्याकरण, गणित इत्यादि शिकविणें बरेंच सोपें असेल; "होय तें सोपें आहे; पण कोंवळ्या मनास सहाय्य करणें, उत्साहास भर घालणें, आशा जागृत करणें, बुद्धिरूपी कोळसे जळते करणें, यत्नांत अपयश आल्यास नवीन नवीन विचार व एकाग्रचित्तें काम करण्याचीहुरूप मनांत भरवून देणें, हें काम सोपें नव्हे; करण्यास अवतारी माणसें हवींत."
 लोकांस, वकील, धर्मोपदेशक, शिपायी, शिक्षक, शेतकरी का- रागीर बनविणें हा शिक्षणाचा उद्देश नव्हे; तर माणसाच्या अं- गांत माणुसकी आणणे हा होय. मिल्टन ह्मणे-“न्यायानें, कुश - लतेनें, उदारबुद्धीनें, खासगी व सार्वजनिक कृत्यें, शांततेच्या


१ एमर्सन.