पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८७

 कीं, ग्रंथकाराच्या भावार्थाकडे लक्ष पोहचत नाहीं. वस्तुतः व्या- करण ही शास्त्राची एक शाखा होय. पण शास्त्रीयरीतीने किंवा त्याबद्दल अभिरुचि उत्पन्न होईल अशा रीतीनें तें शिकविलें जात नाहीं.
 आणखी, सध्यांच्या पद्धतीप्रमाणें मुलांस लॅटिन किंवा ग्रीक बोलावयास शिकवित नाहीं. मूर्खपणाची इयत्ता करण्याच्याच उद्देशानें, अथवा शिक्षण जेवढे निरुपयोगी होईल तेवढे करण्यास शेवटचा उपायच ह्मणून की काय, रोमी व ग्रीक लोक शब्दांचे जे उच्चार करीत त्याहून निराळे, खरोखर इतर राष्ट्रांतील लोकांच्या, फार तर काय, स्कॉच लोकांच्या उच्चाराहून देखील निराळे उच्चार करण्यास मुलांस शिकवितात.
 अशा पद्धतीमुळे मृतभाषाज्ञानाची अभिरुचि उत्पन्न होत नाहीं. कॉर्नहिलपासून केटोपर्यंतच्या संक्षिप्त प्रवासवृत्तांतांत टॅकरे अशी एक कोटी करितो. ग्रीक भाषेची अधिदेवता त्याला येऊन भेटते व अॅथेन्समध्यें आल्यापासून तुला आनंद होतो कीं नाहीं असें त्याला विचारिते. त्यावर तो उत्तर करितो - "माते, लहानपणीं गुरुजीनें फार कष्ट करून आपली संगत कंटाळवाणी वाटावयास लाविली. ती इतकी कीं, आतां तरुणपणीं आपल्याशीं सलोख्यानें वागण्याचें होत नाहीं." हें बोलणें कदाचित् शिष्टा- चारास अनुसरून नाहीं, पण तें खरें आहे.   मृतभाषाज्ञान महत्वाचें खरें पण तें शिक्षणाचें एक अंग होय. " मानुषी भाषाज्ञान" हा शब्दच जुन्या मताप्रमाणें, शिक्षणाचा मनुष्यप्राण्यांबद्दलच्या कळकळीशीं निकट संबंध होता, असें दाखवितो. ह्मणजे माणसांस एकमेकांशीं बद्ध करणारा जो आ- पलेपणा तो ज्ञानाने जास्त व्यक्त होऊं लागला पाहिजे असें द- र्शवितो. शेक्सपीयरला लॅटिन थोडें येत होतें व ग्रीक ह्याहून