पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८६

नंदात घालवितो, त्यांत कांहीं तरी सत्कार्य करण्यास त्याची तयारी करणें हा असावा.
 जवळ जवळ २०० वर्षापूर्वीच “पुस्तकें विकून टाका, व भट्ट्या विकत घ्या; ह्मणजे सरखती देवी (मिनर्व्हा ) वंध्या आहे तिला टाकून द्या, व व्यापारधंद्याचा अभिमानी देव त्वष्ट्रा ( व्हल्कन ) ह्याचे पाय धरा" ह्मणून सांगणाऱ्या लोकांविषयीं बेकननें उल्लेख केला आहे. शारदेला मुळींच सोडून देतां कामा नये, हें खरें आहे. पण सृष्टीनें आपल्यापुढें जें पुस्तक उघडून ठेविलें आहे त्यावर आपलें शिक्षण पुरेसें बसविलेलें नाहीं.
 ज्याप्रमाणें कांटा, चमचा, सुरी इत्यादि वस्तु असल्या ह्मणजे जेवण होत नाहीं, त्याप्रमाणें वाचावयास लिहावयास आलें, ग- णित व्याकरण आलें, ह्मणजे शिक्षण झालें असें नाहीं. एब्राहाम, इझॅक, जेकब ह्यांस लिहिताही येत नव्हतें व वाचताही येत नव्हतें; व कदाचित् त्रैराशिक ह्मणजे काय हेंही कळत नव्हतें.
 मृतभाषांच्या अभ्यासाविरुद्ध मी बोलतों असा वारंवार मा- झ्यावर आक्षेप येतो; पण असें मी कधींच बोललों नाहीं. मृतभा- षाज्ञान हा शिक्षणाचा एक अत्यंत आवश्यक भाग आहे; व त्याची किंमत कमी लेखणें किंवा त्याकडे दुर्लक्ष करणें मूर्खत्वाचें होय. पण मृतभाषाज्ञान हेंच पुरें शिक्षण नव्हे. तरी चार्लस बक्स्टन ह्मणतो त्याप्रमाणें आपलें शिक्षण ह्मणजे "बहुतकरून २००० वर्षांपूर्वी मृत झालेल्या मनुष्यांनी जे शब्द वापरले असते ते शब्द फक्त शिकणें होय." मृतभाषांसाठीं इतर विषयांकडे दुर्लक्ष क रणें ह्मणजे, सिसरो ह्मणतो त्याप्रमाणें, फक्त उजव्या शरीरार्धाची काळजी घेऊन डाव्या अर्धाकडे दुर्लक्ष करण्यासारखें होय. मृत- भाषाज्ञान ह्या नांवाखालीं मोडणारें पुष्कळ ज्ञान खरोखर मृत- भाषाज्ञान नसतें. व्याकरण घोटण्यांत इतकी मेहनत केली जाते