पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८५

लक्ष पुरवावें लागेल, व दिलेले आंकडे शास्त्रीयदृष्टीनें अगदीं ब- रोबर ठरतील असें देखील नाहीं, इत्यादि गोष्टी मला कळून चुकल्या आहेत. तरी ते आंकडे समाधान मानण्याजोगे आहेत व त्यांपासून बरेंच घेण्याजोगें आहे.
 कोणत्याही देशांतील गुन्ह्यांपैकीं अगदीं थोडे गुन्हे जाणून- बुजून दुष्टपणा केल्यामुळें, किंवा अपरिहार्य मोहांत पडल्या- मुळे झालेले असतात. पुष्कळ गुन्ह्यांचें मुख्य कारण ह्मणजे अ- ज्ञान व मद्य होय. विशेष आनंद मानण्याजोगें जें शिक्षणाचें फळ आपणांस मिळालें आहे तें पुढील गोष्टींवरून होय. मुलांस शाळेमध्यें चांगळे वळण मिळतें, स्वच्छता व टापटीप ह्यांच्या संवयी मुलांस लागतात; इतकेंच नव्हे, तर त्यांना रस्त्यांत भटकून दुर्गुण शिकावयास वेळ सांपडत नाहीं; किंवा गुन्हेगार व भटक्या लोकांच्या उदाहरणाचें जें धुळीस मिळविणारे वळण त्यापासून त्यांचा बचाव होतो.
 अनाथांच्या पोषणार्थ द्यावा लागणारा कर कमी होणें, तुरंग रिकामे पडणें, ह्मणजे अनाश्रित लोकांची व गुन्हेगारांची संख्या, विशेषेकरून अल्पवयी गुन्हेगारांची संख्या कमी होणें हे शिक्ष- णाचे फायदे आपल्या प्रत्ययास येऊ लागले आहेत.
 तरी पण शिक्षणाची उत्तम पद्धत आपण शोधून काढिली आहे किंवा नाहीं, त्याबद्दल संशयास जागा आहे. ह्या जगांत आ- पणांस तीन प्रश्नांचें उत्तर पुनःपुनः द्यावें लागतें: अमुक गोष्ट बरी वा वाईट आहे? खरी आहे वा खोटी आहे? एकादी वस्तु सुरूप वा कुरूप आहे ? ह्या प्रश्नांची उत्तरे देण्याचें सामर्थ्य शिक्षणानें आपल्या अंगीं आणिलें पाहिजे.
?  आयुष्याचा उपभोग घेण्यास मनुष्यमात्राची तयारी करणें हाच केवळ शिक्षणाचा हेतु नसावा; तर जें आयुष्य मनुष्य आ-