पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८३

हजारांवर आली. शेवटचा आंकडा जो मला मिळाला आहे त्याप्रमाणें ती संख्या ५१०० होय.
 धर्माचें अन्न खाणाऱ्या लोकांचे आंकडे घेतले तरी १८७० त अनाथाश्रमांत रहाणाऱ्या लोकांची संख्या प्रत्येक हजारीं ४७ होती, असें आपणांस आढळून येईल. मागाहून प्रमाण हजारौं ५२ पर्यंत चढलें होतें. आतां आंकडा हजारी २२ वर आला आहे. व राजधानींत आंकडा अगदीच कमी आहे, हें सांगण्यास स- माधान वाटतें. सारांश अनाथ लोकांचें प्रमाण निम्मेनें कमी झालें आहे. लोकांकडून कर घेऊन गरीबांस पोसण्याचा वार्षिक खर्च ८० लक्ष पौंड होतो. तो पूर्वीप्रमाणेंच आहे असेंचाललों तर तो १ कोटी १६ लक्ष, ह्मणजे ८० लक्षांच्या दुप्प- टीने पाहिजे होता. वीस वर्षांपूर्वी जो कर देत होतों तो जर आज देत असतों, तर बंदीवानांकरितां ४० लक्ष पौंड व अनाथ लोकांकरितां ८० लक्ष पौंड अधिक खर्चावे लागले असते.
 भयंकर गुन्ह्यांचे आंकडे विशेष समाधानकारक व क्ष ठेवण्याजोगे आहेत; असें आणखी सांगितलें पाहिजे. ठोकळ प्रमा- णानें ठेपेची शिक्षा झालेल्या लोकांची वार्षिक संख्या १८६० त संपणाऱ्या वर्षपंचकांत फक्त २८०० होती. ही संख्या सारखी कमी होत गेली, व लोकसंख्या जरी बरीच वाढली तरी ती गेल्या वर्षी ह्मणजे ७२९ भरली. खरें पाहिलें असतां जन्म- ठेपीच्या कैद्यांस ठेवण्याचे ८ तुरुंग निरुपयोगी झाले आहेत; व त्यांचा दुसऱ्या कामाकडे उपयोग करितात.
 गुन्हे व शिक्षण ह्यांच्यामध्यें किती निकट संबंध आहे हें सिद्ध करण्यास जे आंकडे नुक्तेच मला मिळवितां आले त्यावरून १५००० लोकांना सजा झाली, त्यांपैकी फक्त ५००० लोकांस चांगलें लिहितां वाचतां येत होतें, व ज्यांना आपणांस सुशिक्षित