पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८२

त्यांचा तो स्तुत्य त्वेष जागच्या जागीं निवाला, व मनाचा उ- ल्हास नाहींसा झाला.
 मॅथ्यू आर्नोल्ड "शिक्षण व झोटिंगबादशाही" नांवाच्या पु- स्तकांत असें ह्मणतो कीं, शिक्षण, त्यापासून होणारा आनंद, व ज्ञान हीं सब झूट आहेत असें ह्मणणारे लोक अद्यापि आहेत; पण हें पुस्तक १८६९ त लिहिलें गेलें.
 १८७० त शिक्षणासंबंधी ॲक्त पास झाला. तें वर्ष आपल्या सामाजिक इतिहासांत महत्वाचें मन्वंतर होय. त्या वेळी आपल्या प्राथमिक शिक्षणशाळांतून १४ लक्ष मुलें शिक्षण घेत होतीं. सध्यां मुलांची संख्या ५० लक्षांवर गेली आहे. आणि त्यापा- सून काय परिणाम झाला ? पहिल्यानें गुन्हेगारांसंबंधाचे आंकडे तपासून पाहूं. १८७० पर्यंत तुरुंगांतल्या बंदीवानांची संख्या वाढेलसा कल दिसत होता. त्या वेळीं गोळाबेरीज करून गुन्हे- गारांची संख्या २०८०० होती, त्या वेळेपासून सारखी उतरत आली ती आतां १३००० आहे. ठोकळ मानानें कमी झाली. आणखी, लोकसंख्या सारखी वाढत चालली आहे हे लक्षांत ठे- विलें पाहिजे. १८७० पासून आजपर्यंत लोकसंख्या वाढली, त्या मानानें गुन्हेगारांची संख्या वाढली असती, तर ती २८००० च्या जवळजवळ असती; ह्मणजे १३०००च्या दुप्पटीपेक्षा जास्त झाली असती. तसें झालें असतें, तर पोलीस व तुरुंगाचा बंदो- बस्त ह्या संबंधानें खर्च ४० लक्षांच्या ऐवजी ८० लक्ष पौं असता. अल्पवयी गुन्हेगारांची संख्या आणखी जास्त कमी होत चालली आहे. १८५९ त १४ हजार अल्पवयी मुलांस शिक्षेस पात्र अशा गुन्ह्यांकरितां सजा झाली. १८६६ त ती संख्या १० हजारांवर आली, १८७६ त ७ हजारांवर व १८८१ त ६