पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८१

व मुलांच्या जन्मस्थितीपलीकडे त्यांच्या इच्छा जाणार नाहींत असलें शिक्षण देण्याची खबरदारी ठेवणें जरूर आहे. गरीब मुलांस लिहिणें, वाचणें, गणित हींच फक्त आवश्यक आहेत. त्यांत लिहिणें, वाचणें धंद्याच्या बारीक सारीक गोष्टी कळण्यास व गणित हिशेब ठेवण्यास उपयोगी.
 ही विचारसरणी सर्वधंद्यांसंबंधी असे. लॉर्ड एल्डन लंदन शहरांतील पेढीवाल्यांपैकी अत्यंत मूर्ख पेढीवाले आपला देवघे- वीचा व्यवहार करण्यास निवडून काढी; व त्याहून जास्त मूर्ख माणसें सांपडल्यास त्यांच्याशीं आपण व्यवहार करूं असें ह्मणे असें सांगतात. हीं माणसें सध्यांच्या माणसांपेक्षा अगदी भिन्न असली पाहिजेत. कामधंदा करणेंच कपाळी आलेल्या मुलांस धंद्यापलीकडे मुळींच शिकवूं नये असें हॅजिलिथचें ह्मणणें होतें. “डोक्यांत धंद्यापलीकडे दुसरे कोणतेही विचार नसले तरी मा- णसाला पैसा मिळवितां येईल.” ही दुसरी पायरी.
 माणसास कारागिरीचें काम चांगलें करितां यावें, व मजुरांस माणुसकीस साजेलसें वर्तन करितां यावें, ह्मणून शिक्षण हवें असें आपण प्रतिपादित करितों. “जो शाळा काढितो तो तुरुंग बंद करितो,” असें विक्टर ह्यूगो ह्मणतो तें योग्य आहे.
 एक स्विस मुत्सद्दी ह्मणे – “आमच्या मुलांच्या नशिबीं ज- न्माचीच गरीबी, पण तीं अज्ञानांत वाढूं नयेत अशी आह्मी ख- बरदारी ठेवितों." इंग्लंदमध्ये देखील आतां आह्मांस शिक्षणाचें महत्व कळू लागले आहे. आतां ग्रे कवीला आमच्या गांवढळा- विषयीं असें ह्मणतां आलें नसतें.
 ......हजारों वर्षांच्या लुटीमुळें ओतप्रोत भरलेलीं आपलीं पुस्तकें विद्यादेवीनें त्यांच्या डोळ्यांपुढे कधीं केलीं नाहींत. अति दारिद्र्यामुळे अज्ञानांत राहणे भाग पडलेल्याबद्दलचा