पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७७

फेड झाल्यासारखी होईल. कारण, निद्रासुख हें काय आहे तें तुह्मांस चांगलें कळून चुकलें असेल. बहुतकरून आपणांस निद्रा- सुखाची अर्धी किंमत देखील कळत नाहीं.
 बऱ्याच शारीरिक रोगांची उत्पत्ति मनांत असते. वैद्यांना रोगाची परीक्षा करण्यास फक्त शारीरिक लक्षणें पाहावयाचीं नसतात, तर त्यांच्या पुढें वारंवार खालील प्रश्न उभा रहातो.
 रोगी मनाला कांहीं औषध सांगतां येत नाहीं काय? मूळ धरून राहिलेलें दुःख स्मरणशक्तींतून उपटून काढितां येत नाहीं काय ? मेंदूवर बिंबलेलीं संकटें खोडून काढितां येत नाहींत काय ? हृदयावर ओझें लादणाऱ्या दुःखकारक गोष्टींचा विसर पाडणारें रुचकर औषध देऊन त्याचा भार कमी करितां येत नाहीं काय ?
 तशांत आरोग्य हें सुखप्राप्तीचें आदितत्व होय. इतकेंच नव्हे, तर सत्कृत्यें करण्यासही तें आवश्यक आहे. त्याचा त्याग करणें ह्मणजे तें फुकट घालविणें; त्यांत आपमतलबीपणाही दिसतो. वाजवीपेक्षां फाजील श्रम केले तर काम चांगल्या रीतीनें करणें अशक्य होतें; निदान आपल्या सामर्थ्यानुरूप करणें तरी अशक्य होतें व असली संवयही वाईट. कारण, अशा रीतीनें काम केलें ह्मणजे पुढे जास्त वेळ विश्रांतीची व स्वस्थतेची जरूरी लागेल. परंतु हें बाजूस ठेविलें तरी, असलें काम पहिल्या प्रतीचें उतरणार नाहीं. आणि त्यावरून त्रासलेल्याचीं व थकव्याचीं चिन्हें दिसतील. सारांश धोरण चांगलें रहाणार नाहीं. व तें काम दोघे चौघे मिळून करावयाचें असल्यास आपसांत दुही व गैरसमज होण्याचा बराच संभव आहे. एकाद्यास चित्र काढ- ण्याचा यत्न करूं द्या कीं, आपला हात थरथरतो व कह्यांत रहात नाहीं, असें त्याला लगेच कळून येईल. असें होण्याचें कारण केवळ स्नायूंची ग्लानि नव्हे तर मेंदूचा थकवा देखील