पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७६

हवा आपणांस हवी असें खात्रीपूर्वक समजावें. मुलांवर कामाचा फार बोजा पडतो असें आपण वारंवार ऐकतों, व मोठीं माण श्रमातिशयानें मरतात असेंही आपण ऐकितों. पण मला वाटतें असलीं उदाहरणें फारच थोडीं असतील. बहुतेक उदाहरणांत आरोग्य नष्ट होतें तें नुसत्या श्रमानें नव्हे, तर संताप, दगदग आणि चिंता इत्यादि गोष्टींमुळें होतें. आळस, बाहेरख्याली, स्वैराचरण ह्यांच्या योगानें पुष्कळांचा अंत झाला आहे; तसा खऱ्या मेहनतीच्या कामामुळे झाला नाहीं. ज्याप्रमाणे स्नायूंस व्यायाम पाहिजे त्याप्रमाणें मेंदूसही पाहिजे. लवकर निजण्याची व मिताहार करण्याची संवय लावून घेतली व इतर चांगल्या संवई जडवून घेतल्या, तर अतिशय मेहनतीचें काम देखील इजा करण्याऐवजी उलट फायदेशीर होईल; मात्र काम शक्तीपलीकडे जातां कामा नये.
 नीज मुळींच येऊं नये असा प्रसंग कधींना कधीं तरी बहुते- कांवर आला असेल; त्या वेळीं मन रंजिस होतें. लहानसहान अडचणी ज्यांतून पार पडण्यांत एरव्हीं आनंद वाटावयाचा त्या अपार वाटू लागतात; मग आनंददायक गोष्टींचा मन त्रास करितें; व वाईट झालें असेल व कदाचित् होण्याचा रंग असेल त्याचा एकसारखा ध्यास घेतें. अशा वेळीं निराश होऊं नका. निद्राभावामुळे कधीं कुणी मेला असेल असें मला वाटत नाहीं. कांहीं करा पण औषधें घेऊं नका; त्यानेंच खरें संकट ओढवतें. घरांत जेवढा थोडा वेळ काढवेल, व बाहेर जेवढा जास्त काढ- वेल, तेवढा काढा; आजूबाजूंच्या गोष्टींपासून होतां होईल तों त्रास करून घेऊं नका. एवढें केलें तर एकाद दिवशीं तरी निद्रासुख तुझांस प्राप्त होईलच अशी खात्री असूं द्या. निद्राभाव फार दिवस चाललेला नसला, तर त्याबद्दल पुष्कळांशीं तुमची