पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८

होय. श्रम करण्यांत आनंद वाटला पाहिजे. तसा आनंद वाटावा म्हणून श्रम नियमानें व हिंमतीनें केले पाहिजेत. पण, विसांवा न घेतां श्रम करण्यांत अर्थ नाहीं. किंवा त्यांकरितां खाणेपिणें, विश्रांति, व्यायाम, सण इत्यादींकडे दुर्लक्ष करितां कामा नये.
 आरोग्य नष्ट झालें ह्मणजे किती अशक्तता वाटते व दैन्या- वस्था होते हैं आपण होऊन आरोग्य घालविलेले असल्यास विशेष नजरेस येतें. उलटपक्षीं कांहीं लोक स्वतःचा मुळींच अपराध नसतां नुसत्या यातना भोगण्यासच जन्मास आलेले असतात. असल्या उदाहरणांत, शारीरिक क्षीणतेच्या मोबदलाच ह्मणून की काय, सृष्टीनें त्यांना निर्मळ व तरतरीत मन दिलेलें असतेंसें दिसतें. असले कांहीं दुर्दैवी लोक जगांत आढळतात. त्यांचा आनंदी स्वभाव व सालसपणा हीं, आपण जे निरोगी म्हणवितों, त्यांस धडा घालून देतात इतकेंच नव्हे, तर नेहमीं यातना भोगाव्या लागत असल्यामुळेंच जणूं असले लोक इतर माणसांपेक्षां अधिक श्रेष्ठ व पवित्र झालेले वाटतात.