पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७५

उपदेश होत असे इतकेंच नव्हे, तर बेकनने देखील औषध घ्यावें असें सांगितलें आहे. पण तें तत्वतःच चुकीचें होय.ती चूक आहे असें दाखवून देणारा पहिला इसम लॉक असा- वासा वाटतो. ओषधिशास्त्र ह्या नांवावरूनच ओषधींचा उपयोग करावा असें निघतें. पण सावधगिरीनें वागलों तर औषधामागें आपणांस फार थोडा खर्च करावा लागेल.
 सृष्टीला आपल्या क्रमानुसार वागूं द्या. तिच्या वाटेस जाऊं नका. 'सृष्टीच्या जागृत तत्त्वांविरुद्ध वर्तन करूं नका, तिला स्वरक्षण करूं द्या, कोणत्याही औषधापेक्षां हैं जास्त फायदेशीर होईल' असें नेपोलियन हाणे.
 बरीचशी शुद्ध हवा, बरेंचसें पाणी व मिताहार ह्यांच्या योगें बहुतेकांस आपल्या अंगीं आरोग्य व शक्ति हीं खेळत आहेत अशी आनंददायक भावना होईल, व अगदीं मातारपण येईपर्यं त्यांच्या अंगांत तारुण्याची तरतरी राहील.
 परंतु आरोग्य हें केवळ शरीरावर अवलंबून नाहीं. 'क्रोध, मत्सर, दुःख, भीति इत्यादि विकार चेतनाशक्तीचा नाश करणारे होत. उलटपक्षी, आनंदी स्वभाव, मनमिळाऊपणा, व मनाचें स्वास्थ्य ही आयुष्याचीं बलवत्तर अंगें होते. '

 लायकर्गसनें प्रत्येक भोजनगृहांतून हास्यरसाभिमानी देवतेचा पुतळा स्थापिला होता असें सांगतात. बफून ह्मणे 'पुष्कळ लोकांस जास्त वर्षे जगतां आलें असतें. पण ते ताठ्यामुळे व जळजळीमुळे मरतात. ' हैं तो आपल्या देशबांधवांविषयीं ह्मणत असे; पण तें इतर लोकांसही लागू आहे. जेव्हां आपल्या शरीरप्रकृतींत चल- बिचल होते तेव्हां आपणांस त्रास होतो; क्षुल्लक गोष्टी भयंकर संकटाप्रमाणें भासूं लागतात. असें झालें ह्मणजे, विश्रांति व शुद्ध


 १ डॉ० रिचर्डसन.