पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७४

फेरफार करूं नका. पण जरूरी असल्यास कराच, व बाकीच्या गोष्टींचा त्या मानानें बदल करा. जेवतेवेळीं, निजतेवेळीं, व व्यायाम करतेवेळीं आनंदांत असणें व मोकळ्या मनानें वागणें हेंच दीर्घायुष्यास उत्तम औषध होय.”
 अँबरनेथी ह्मणतो—“ तुझांला निरोगी रहाणें असले तर दिवसा सहा पेन्सांवर उपजीविका केली पाहिजे; व ते सहा पेन्स स्वतः मिळविले पाहिजेत." ह्या बोधप्रद ह्मणींत खाण्यापिण्यास व व्यायामास आवश्यक असणाऱ्या गोष्टी थोडक्यांत सांगितल्या आहेत. ह्या स्वस्ताईच्या दिवसांत सहा पेन्सांत चांगलें पुरेसे पौष्टिक अन्न विकत घेतां येईल; पण दारू पिऊन बेहोष होतां येणार नाहीं, आणि अधाश्यासारखें खातां येणार नाहीं. ही ह्मण व्यायामास देखील जितकें महत्व द्यावें तितकें देते.
 सध्यांच्या वस्तुस्थितीप्रमाणें, उघड्या हवेंत कितीही वेळ घाल- विला तरी तो फुकट खर्चिला असें होत नाहीं. अशा घटका आयुष्य- क्रमांत मोजल्या जाणार नाहींत, इतकेंच नव्हे, तर त्या तुमच्या आयुष्यास भर घालितील-इहलोकींचें आयुष्य लांबविण्याकडे त्यांचा कल असेल. रोमन लोकांची एक उत्तम ह्मण आहे; ती ही कीं, घराबाहेर कितीही वेळ असलांत तरी त्यापासून तोटा नाहीं.
 स्वच्छ हवेप्रमाणें स्वच्छ पाणीही जरूरीचें आहे. आंतून व बाहेरून पाणी जेवढे घेववेल तेवढें घ्यावें. थंड सोसलेंच तर बरें. दांत साफ ठेवणें इत्यादि गोष्टी क्षुल्लक वाटतील, तरी त्यांमुळे देखील शरीरसुखांत थोडा कमीपणा येतो असे नव्हे.
 आरोग्य बहुतकरून आपल्या संवयी व अन्न ह्यांवर अवलंबून असतें; औषध घेण्यावर नसतें. आपले पूर्वज रोगांपासून मुक्त रहाण्यास औषधें घेत असत. वैद्यांच्या पाठशालांतून तसला