पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७३

शक्ति कायम ठेवून अंगीं सौम्यपणा आणितो. आवेश मर्यादित करितो. ह्या जगांत बरें करून घेण्याचें गुप्त असे मोठें साधन मिताहार होयं.
 मिताहार हें सामर्थ्याचें आदितत्व होय;क्षीणत्वाचें नव्हे.क्षीणत्वाचें नव्हे. त्यामुळे आत्मसंयमन करितां येतें.
 जेवतेवेळीं रेंगाळत बसूं नका; तरी पण जेवतांना घाई करूं नका. जेवून उठतेवेळीं नेहमीं थोडी भूक राखून उठावें असें ह्मटलें आहे. पोट गच्च भरलें तर मेंदूला काम होत नाहीं. 'जेवणानंतर थोडा वेळ स्वस्थ बसावें' हा नियम चांगला आहे. एक जेवण होऊन दुसरें होईपर्यंत कांहींच काम करितां येणार नाहीं इतकें खाणे हा आयुष्यक्रम अतिक्षुद्र होय. जीवधारणा होईलशा बेतानें खा; केवळ खाण्याकरितां जीवधारणा करूं नका. फार वेळ जेवित बसणें ह्मणजे मरण लवकर ओढवून घेण्या- सारखें होय.
 रानटी लोक जेव्हां वैदूच्या धंद्यास आरंभ करितात तेव्हां त्यांची पहिली तयारी ह्मणजे बऱ्याच दिवसांचें उपोषण होय. त्याचा परिणाम असा होतो कीं, ज्ञानतंतूंस अधिकाधिक चेतना येत जाते; ह्याला ते ईश्वरी प्रसाद समजतात. ते ही गोष्ट विको- पास नेतात ह्यांत संशय नाहीं. तरी पण आहार कमी केल्यास मेंदूचें काम जास्त करितां येतें हें प्रत्येकास शोधांत कळून येईल.
 आणखी, पोट रिकामें असलें ह्मणजे मनुष्यास हुशारी असते. फार खाल्लें ह्मणजे मनुष्य मंदावतो. इतर एकंदर सर्व रोगांमुळे जितकीं माणसें आजारी पडतात, तितकींच एका अजीर्णामुळे आजारी पडतात.
 बेकन ह्मणतो—“खाण्यापिण्याच्या मुख्य पदार्थात एकदम


१ मिस सिव्हेल.