पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आयुष्याचा सदुपयोग.


भाग १.


मोठा प्रश्न.

 ह्या आयुष्यांत शिकावयाची मोठी गोष्ट झटली ह्मणजे हें आयुष्य कसें घालवावें ही होय. मनुष्यप्राणी आपल्या जिवास जितका जपतो तितका कशासही जपत नाहीं. तरी पण त्याचें चांगलें जतन करण्याकडे तो जितकें दुर्लक्ष्य करितो तितकें कशाकडेही करीत नाहीं. ही कांहीं लहानसहान गोष्ट नव्हे. हिपोक्रेटीस आपल्या “आयुर्वेदी सूत्रां” त ह्मणतो-

अनन्तपारं किल शब्दशास्त्रं स्वल्पं तथायुर्बहवश्व विघ्नाः ।
सारं ततो ग्राह्यमपास्य फल्गु हंसो यथा क्षीरमिवाम्बुमध्यात् ॥ २ ॥

 ह्या जगांत क्षेम व बरकत असणें हें आपल्या वस्तुस्थितीवर अवलंबून नसतें. तें आपल्या उद्योगावर अवलंबून असतें. “दुसऱ्यांच्या हातून धुळीस मिळालेल्या माणसांपेक्षां आपल्या हातून आपला नाश करून घेणारी माणसें अधिक सांपडतील. वादळांच्या योगानें किंवा भूकंपांच्या योगानें जितकीं शहरें व घरें जमीन दोस्त झाली असतील त्यांपेक्षां जास्त मनुष्यप्राण्याने धुळीस मिळ- विलीं असतील.” ह्या जगांत प्राणिमात्रांचा दोन रीतींनीं नाश होतो; एक कालावसानेंकरून व दुसरा स्वहस्तेंकरून. इतर सर्व वस्तूंच्या नाशापेक्षां मनुष्याचा नाश जास्त दुःखप्रद वाटतो. सेनीकाच्या मताप्रमाणें मनुष्याचा मोठा शत्रु ह्मणजे त्याचें मन हाच होय. लाब्रुअर ह्मणतो – “पुष्कळ लोक इतरांस कष्टी करण्यांत