पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ण्याचा यत्न करून मुळांतला अर्थ कमी करण्यास माझें मन घेईना. कांहीं ठिकाणीं इंग्रजी कवींचें व आपल्या कवींचें विचार- साम्य आढळून येतें; त्या ठिकाणीं आपल्या कवींचे उतारे देण्याचा मानस होता; पण तसें करण्यांत बराच वेळ जाईल असा विचार मनांत आल्यामुळें तो तसाच ठेवावा लागला.

 माझ्या अल्प समजुतीप्रमाणें प्रेसच्या अधिकाऱ्यांच्या सहा- य्यानें ग्रंथ जेवढा शुद्ध छापवितां आला तेवढा छापविला आहे. कांहीं चुक्या राहिल्या असल्यास त्यांचा दोष सर्वस्वी माझ्याकडे आहे. सुज्ञ लोक हंसक्षीर न्यायानें गुणग्रहण करितील अशी आशा करून हा लेख पुरा करितों.

१५ मे १९०१ | मुंबई.    शा. रा. ध.