पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७१

सुटतें, डोळ्यांतून पाणी गळूं लागतें, रात्रीं अस्वस्थ वाटतें, भयंकर स्वप्ने पडतात, सकाळीं तोंडास घाण मारते, व सर्व गोष्टींचा अगदीं विसर पडूं लागतो." सर वॉल्टर रॅले ह्याचा उतारा देऊन आणखी असें ह्मणतो – “ज्याची सुराआक्कावर भक्ति बसली त्याजवर कोणीही विश्वास ठेवित नाहीं. कारण, त्याजवळ गोष्ट गुप्त रहात नाहीं. सुरा माणसास पशुवत् वर्तन करण्यास लाविते; इतकेंच नव्हे, तर त्याकडून वेडे चाळे करविते. जर तुला ती आवडूं लागली तर, तुझी खुद्द बायको, तुझे मित्र, तुझीं मुलेबाळें तुझा तिरस्कार करितील. "
 मद्याचा निषेध करणारे उत्तम उद्गार कवि शेक्सपीयरच्या नाटकांत बरेच आढळतात. अरेरे विचारशक्ति नाहींसा करणारा शत्रु माणसांनीं घशांतून आंत येऊ द्यावा; मोठ्या आनंदानें टिऱ्या पिटून, लोळून त्यांनीं पशुप्राय बनावें हें किती लाजिर- वाणें आहे ! “समजूतदार असून माणसानें क्षणांत मूर्ख, क्षणांत पशु बनावें ना ?” तरी असें बोलणें ह्मणजे पशूंना उगाच दूषण दिल्यासारखें होय.
 उलटपक्षी मिताहारापासून किती विलक्षण फायदा होतो तो पहा ! जरी मी ह्यातारा दिसतों, तरी मी बळकट असून माझ्या अंगांत कुवत आहे. कारण, तरुणपणीं मी उष्ण व मादक पेयांचा माझ्या रक्ताला स्पर्श होऊं दिला नाहीं. **** ह्मणून माझें उतार वय रोगरहित हिंवाळ्याप्रमाणें आहे. त्यांत धुकें आहे, पण शरीराची तरतरी कायम आहे'.

दारूबाजीच्या अनिष्टाचा शुभवर्तनांत व्हावा तितका निषेध झालेला नाहीं, ह्याबद्दल कधीं कधीं लोक आश्चर्य करितात. पण हें लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, तें उष्ण देशांत लिहिलें होतें.


१ शेक्सपीयर.