पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७०

 "फार स्वस्थता हें त्याच्या रोगाचें कारण होय” असे मिल्टन हॉबसनबद्दल ह्मणे. हेंच ह्मणणें पुष्कळ रोगी माणसांस लागू पडतें. “ज्या हॅनिबॉलला बर्फानें जिंकिलें नाहीं, किंवा आल्प्स पर्वतानें हटविलें नाहीं तो हॅनिबॉल कॅम्पेनियामधील चैनीच्या पदार्थांपुढें हटला. जो शस्त्रविद्येत अजिंक्य तो चैन- बाजीस हार गेलो.”
 इंद्रियांपासून पुष्कळ अपायरहित सुखें आपणांस मिळतात. परंतु त्यांच्या कथांत जर आपण वागूं लागलों तर, ज्याप्रमाणें पुरातनकाळच्या नागकन्या खलाशांस खडकांवर किंवा भोंव- ऱ्यांमध्ये बुडवून मारीत असत त्याप्रमाणें तीं आपणांस ह्या भव- सागरांतील भोंवऱ्यांत बुडवून निःसंशय मारितील.
 जेवण्याखाण्यांत चुका करून आपण बरेच रोग जडवून घेतों. पेय ह्या शब्दाचा अर्थ वारंवार दारू असाच घेतात. व दारू हा पदार्थ उत्तरेकडील राष्ट्रांची मूलव्याधीच होय. कांहीं ठिकाणीं सुरा रामबाण औषधाप्रमाणें उपयोगी पडते. पण सुरा- देवी इतकी जबरदस्त मोहिनी आहे कीं, आपल्या देशबंधूंची जवळ जवळ अर्धी दुःखें, पापें, व यातना ह्यांचा उद्भव तीच करिते.
 शुद्ध साधें पाणी फारच उत्तम. त्यानें कोणाचीही प्रवृत्ति पापाकडे केली नाहीं; गुन्हा हा मद्याचा अर्क होय, असें बहुतेक झटलें तरी चालेल. एक यहुदी ह्मण अशी आहे कीं, “ जेथें सैतानास स्वतः जातां येत नाहीं तेथें तो सुराआक्काला पाठवितो.” एकदां का पिशाच्च आंतं घुसलें आणि घरांत त्यानें ठाणें दिलें कीं, शांति, आशा, आनंद ह्यांचें ठाणें उठलें.
 प्लिनी ह्मणतो – “सुराआक्काच्या प्रभावानें हातांस कांपरें


१ सेनिका. २ चालीस.