पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६९

त्यांचे जंतु आपल्या शरीरांत शिरले असले पाहिजेत. ह्मणून, आपण स्वतः शुद्ध असावें इतकेंच नव्हे, तर रहाण्याचें आपलें घर, वापरण्याचे कपडे, पिण्याचें पाणी आणि श्वासोच्छ्वास कर- ण्याची हवा, ह्रीं सर्व स्वच्छ असावीत हें महत्वाचें आहे.
 मनुष्याचा देह खरोखर एक सततची दैविक चमत्कृति होय. मेंदूमध्यें किती विलक्षण झान रहातें त्याचाच विचार क्षणभर कराना ! इच्छेच्या अनुरोधानें स्नायु किती तत्परतेनें वागतात तें पहाना ! सर जेम्स पेजटनें आपणांस सांगितलें आहे कीं, एकाद्या नेहमीं तालीम घेणाऱ्या गवयाला पियानोवर एका सेकंदास २४ सूर काढितां येतात. प्रत्येक सुराच्या वेळीं मेंदूतून बोटाकडे स्नायूंस गति देणारा प्रवाह गेला पाहिजे, आणि तोच बोटाकडून मेंदूकडे गेला पाहिजे. प्रत्येक सुरास बोट तीन वेळ हालविलें पाहिजे; एकदां सुराची पट्टी दाबतेवेळीं, एकदां ती सोडते वेळीं, आणि निदान एकदां तरी मिश्रसूर काढिते वेळीं; रीतीनें एका सेकंदास कमीत कमी ७२ वेळां चलनवलन होतें. प्रत्येक चलनवलनाच्या वेळीं इच्छेची एकएक क्रिया घडते; व प्रत्येक वेळीं, बिनचूक, नियमित अवसानानें, नियमित त्वरेनें, व नियमित ठिकाणीं गतीचा प्रवाह जातो.
 त्वचा हें एक नाजूक व फार करामतीनें बनविलेलें इंद्रिय होय. त्याला लक्षावधि छिद्रे आहेत. त्यांत शेंकडों मैल लांबीच्या धमन्या, नाड्या, स्नायु, अतिसूक्ष्म छिद्रे आहेत. हें इंद्रिय वारं- वार नवें होत जातें; व ह्यानें आपली कामें यथायोग्य करावीं, ह्मणून त्याची योग्य तरतूद ठेवावी लागते, व पुष्कळसें पाणी वापरावें लागतें. आणखी, कैंसास जशी फणी तसा शरीरास ब्रश होय. हें आश्चर्यकारक इंद्रिय निरोगी ठेवण्यासाठीं त्याचे निरनिराळे भाग नेहमी वापरण्यांत आले पाहिजेत.