पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६८

 “काय ! ईशस्वरूपी आत्मा जो तुमच्या देहांत वास करितो त्याचें देऊळ ह्मणजे तुमचें शरीर होय, हें शरीर तुझांस ईश्वराक- डून मिळालें, त्यावर तुमचा हक्क नाहीं, हें तुझांस माहीत नाहीं?” मध्ययुगांतले लोक शरीरास तुच्छ मानीत; इजिप्तियन लोक त्यासच पूज्य मानीत, व त्यांचें हें मत अधिक शहाणपणाचें दिसतें. कारण, चिंध्या व शरीरावर चढणारा मळ ह्यांमध्यें अं- तस्थ गुण नाहीं; वस्तुस्थिति खरोखर त्याच्या उलट आहे.
 “मानसिक शिक्षणपद्धतींचें जसें ग्रीक लोकांचें एक शास्त्र होतें, तसेंच शारीरिक शिक्षणपद्धतीचेंही होतें; व ते दोहोंचाही सारखाच अभ्यास करीत. त्यांच्या स्त्रिया शरीरास शोभा येईल असा व्यायाम करीत, व कांहीं तर तालीमही करीत. उघड्या व निरोगी अशा ठिकाणीं राहून त्यांनीं आपल्या शरीरांस इतकें वळण आणिलें होतें कीं, त्यांच्या आकृती कल्पांतींही ज्यांची ब- रोबरी होणार नाहीं, अशा मानवी सौंदर्याच्या केवळ मूर्तिच होऊन बसल्या आहेत."
 जिणें चिरकालिक नाहीं, आह्मांस जिणें हवें. मरण नको. अधिक आयुष्य पाहिजे; तें देखील चिरस्थायी पाहिजे.
 मनाच्या निर्मळपणाची खालील पायरी शरीराचा निर्मळपणा होय, अशी एक जुनी ह्मण आहे. वैद्यशास्त्रांत झालेले सांप्रतचे शोध हिलाच पुष्टीकरण देतात. इतकेंच नव्हे, तर असें कांव तेंच कारण कां असावें ह्याचा स्पष्टपणें उलगडा करितात.
 पुष्कळ रोगांचें मूळ स्नायूंच्या रोगटपणांत नसतें; रोग इतर जंतूंच्या आगंतुकीमुळे जडलेले असतात. पटकी, देवी आणि कदाचित् इतर पुष्कळ रोग आपोआप उद्भवत नाहींत. तर,


१ सेंट पॉल. २ किंग्स्ले.