पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६७

करितांना आपणांस नेहमीं वांकावें लागतें. त्यामुळे मेंदूस व स्नायूंस जास्त श्रम घडतात. शहरांतून राहणारे लोक आपल्या पूर्वजांपेक्षां जास्त नेभळे झाले आहेत ह्याबद्दल क्वचितच संशय उद्भवेल, असें मला वाटतें. शहरांतून, किंवा मोठाले कारखाने जेथें आहेत अशा इतर गांवांतून गाडींत बसून एकादा फिरला, तर पुरुष व स्त्रिया ह्यांची फेंक दिसणारी तोंडें, आकुंचित छात्या इत्यादि परींनी व्यक्त होणारा कमकुवतपणा त्याच्या लक्षांत आल्याशिवाय रहाणार नाहीं. आणखी, आरोग्यसंरक्ष- णासाठी केलेल्या तजविजीमुळे एका प्रकारें अनर्थ ओढवला आहे. कारण, त्यामुळे अशक्त ह्मणजे जगांत रहाण्यास अयोग्य व रोगी माणसें देखील वांचूं लागलीं आहेत. दुखण्याची विपत्ति क्षुल्लक कारणांमुळें आपणांवर ओढवते. हीं कारणें, थोडीशी काळजी घेतल्यास, व आरोग्यसंरक्षणाचीं प्राथमिक तत्वें माहीत असल्यास, निवारण्यासारखीं आहेत.
 ज्या युगांबद्दल ऐतिहासिक माहिती थोडीशी तरी उपलब्ध आहे त्या युगांत देखील शहाणे मुत्सद्दी आरोग्यविषयाकडे लक्ष शरीर निरोगी तर मन निरोगी ह्याचें खरें महत्व देत असत. त्यांना उमगलें होतें.
 शरीरसंपत्तीचें जतन करणें हें आपलें पवित्र कर्तव्य होय. आरोग्यसंरक्षणाचे नियम मोझेजच्या धर्मोपदेशाचा बराच मोठा भाग होय, असें कधीं कधीं ह्मणतात. हें खरें असेलसें वाटत नाहीं. आपल्या धर्मपुस्तकांतही नियमसंहिता दिलेली आहे. तींत समाजविषयक, धर्मविषयक व राजनीतिविषयक नियम आहेत हे लक्षांत ठेविलें पाहिजे. तथापि, आरोग्यविषयक निय- मांचा जरी धर्मांत न्यायानें समावेश होत नसला, तरी ते बहु- तेक धर्मविषयक नियमांच्या तोडीचे नेहमीं मानिले जातात.