पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग ५.
आरोग्य.

 आत्मा मनुष्याचा उच्च अंश खरा, पण निदान सद्यस्थितींत तो शरीरद्वारें क्रिया करितो. ह्याचें विनोदपर उदाहरण ह्मटलें ह्मणजे आपला प्रख्यात देशबांधव फॅरडे ह्याच्या प्रत्ययास आ- लेली गोष्ट होय. लहान वयांतच त्यानें गांध्याच्या दुकानांत पोटगीच्या धंद्यास सुरुवात केली. त्याला एकदां एका गि-हाइ- काकडे पाठविलें; त्यानें घांट वाजविली, पण कोणी जबाब दे ईना. घरांत कोणी आहे किंवा नाहीं ह्याचा निर्णय करण्यास त्यानें आपली मान कठड्यांतून आंत घातली, तों त्याच्या म- नांत प्रश्न उद्भवला कीं, आपण खरोखरी कठड्याच्या कोणत्या बाजूस आहोत? विचार करून त्यानें ठरविलें कीं, ज्या बाजूस माणसाचें डोकें त्या बाजूस तो असला पाहिजे. इतक्यांत, त्याला मागें सरण्यास अवकाश मिळण्यापूर्वी दरवाजा एकाएकी उघडला, व त्याचा पाय कठड्यांत सांपडून चेंगरला; आणि "डोकें व इतर अवयव" ह्या जुन्या कल्पित गोष्टीचें तात्पर्य खा- डकन् त्याच्या डोळ्यांपुढे उभें राहिलें.
 आपल्या आयुष्याच्या वस्तुस्थितीमुळे आरोग्याकडे लक्ष पुर विणें विशेष महत्वाचें झालें आहे. आपले वाडवडील गांव- ढ्यांत जाऊन जास्त वेळ रहात, जास्त वेळ मोकळ्या हवेंत फिरत, व कृषिकर्मात जास्त प्रमाणानें गुंतलेले असत. आपण अधिक प्र- माणानें शहरांत गोळा होऊन रहातों, पूर्वीपेक्षा जास्त काम घ रांत बसून, दुकानांतून आणि कारखान्यांतून, करितों. आ- पलीं सारीं कामें एकजागीं बसून करण्याचीं असतात; व तीं