पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६५

जेव्हां आत्मा देहावर योग्य दाब ठेवितो, अथवा मोठ्या मम- तेनें आपली ताबेदारी चालवितो, देहाचा फायदा होईल अशी त्याची काळजी घेतो, त्याकरितां विपुल संग्रह करितो व भागी- दार असून हलक्या प्रतीचा जो देह त्याची कींव बाळगून वर्तन करितो, तेव्हांच देह व आत्म्या ह्यांच्या संयोगानें पूर्ण मनुष्य होतो. परंतु उद्यां जर देह अम्मल चालवू लागला, व वासनातिरेकानें बुद्धीस भ्रम करून संकल्पशक्ति व आवडनिवड करण्याची शक्ति ह्यांस त्यानें अंकित करून ठेविलें, तर देह व आत्मा ह्यांची चांगली जोडी जमली नाहीं असें होतें, व माणूस मूर्ख व दुःखी होतो. आत्मा शास्ता नसला तर तो देहाला योग्य जोडीदार नव्हे. तो शास्ता असला पाहिजे, किंवा त्यास गुलाम तरी झालें पाहिजे. "


१ जेरेमी टेलर.