पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४

 वाटला. तसेंच सृष्टीमध्यें देखील इच्छुजनांस आपल्या मोठ्या आवडीचे पदार्थ सांपडतील.
 तथापि, खऱ्या सौख्यजनक गोष्टींची लांबलचक यादी, नांवे सांगून, संपविण्याचा यत्न करण्याचा माझा मानस नाहीं. व आनंद देणाऱ्या अशा अपायरहित पुष्कळ गोष्टी असतां अशुद्ध, किंवा ज्यांच्या शुद्धतेविषयीं निदान संशय असेल अशा गोष्टी कां निवडाव्या ? होतां होईल तो शुद्ध आनंदजनक गो- ष्टींचा उपभोग घ्या. मग इतर गोष्टींबद्दल विचार करूं.
 ज्यांनीं ह्मणे जगाचा बरावाईट अनुभव घेतला, किंवा जे आह्मांस जग कळतें असें ह्मणतात त्यांची मोठी चूक होते. ह्या जगांतील खऱ्याखुऱ्या गोष्टी कोणाही गांवढ्याला कळतात तितक्या देखील त्यांस कळत नाहींत. व हा गांवढ्या आपल्या गांवाच्या बाहेर कधीं गेलेला नसतो; पण त्यानें गांवांतच राहून आपल्या डोळ्यांचा नीट उपयोग केलेला असतो. आपल्या विष- यवासना तृप्त करण्यांत घालविलेले आयुष्य, ज्यास "आनंदाचें आयुष्य” असें चुकीनें ह्मणतात, तें सुखाचें समजणें ह्मणजे सुख ह्या शब्दाचा कुत्सित रीतीनें उपहास करण्याप्रमाणे होय. त्यास बळी पडलेले लोक स्वतःकडे दोष येत असतांही जगाब- द्दल कुरकुर करूं लागतात. डी मुसे ह्मणे – “मी तरुण आहे, व आयुष्याचा फक्त अर्धमार्ग मीं आक्रमिला आहे; तरी मी तितक्यांतच त्रासून पुनःपुनः वळतों व मागें पाहतों." ह्या बोलण्यांत किती औदासीन्य दिसून येतें ! त्यानें आपलें आ- युष्य शहाणपणानें घालविलें असतें, तर गतकालाबद्दल त्यानें ईश्वराचे आभार मानिले असते, व भावी कालाबद्दल त्याला मोठी आशा रहाती.
 आयुष्यक्रमाची किंमत नीतिदृष्ट्या ठरवावयाची. "आणखी,