पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६३

किरणांची चकाकी, गवतावरील छाया, चंद्र व रात्री दृष्टीस पडणारे इतर तारागण इत्यादि पाहण्यांत एकाद्याला अत्यंत सुख वाटतें. दुसऱ्या माणसाला त्यांचें कांहीं वाटत नाहीं. अशा माणसाला चंद्र व तारे ह्यांची मातब्बरी नाहीं. कीटक, तरुगण, पुष्पें, सरित्समूह, सरोवरें, समुद्र, चंद्रसूर्य, तारे ह्यांच्या पासून त्यास सुख होत नाहीं. कारण, "शरीरास आत्म्याचें वळण असतें; आत्मा हा सांचा होय, व शरीर त दाकार बनतें."
 “क्षुद्र अहंकारी मानवास भपका दाखविण्याकरितां कृत्रिम रंग पुरे आहेत. परंतु नश्वर अभ्रमालेच्या किंवा रानटी बदकाच्या एका पिच्छाच्या रंगाबरोबर साम्यता करण्याइतक्या योग्यतेचे ते नाहींत. "
 रस्किन ह्मणतो – “आणखी एकजातीचा प्रकाश आहे. तो प्रकाश सौंदर्याची जास्त अनुभूति झाल्यामुळे डोळ्यांस एकसा- रखा पहावासा वाटतो. तो प्रकाश कोणता, तर अरुणोदय- समयींचा किंवा संध्यासमयींचा, व क्षितिजावरील निळ्या आकाशांत दिवट्यांप्रमाणे दिसणाऱ्या आरक्त अभ्रमालेचा. " आकाशांतील रंगांनीं पृथ्वी प्रकाशित झालेली दिसते, व "पलीक- डलें नारिंगी दिसणारें पश्चिम गिरिशिखर अस्तास जाणाऱ्या सूर्य- किरणांचें परावर्तन आज हजारों वर्षे करीत आले आहे." सू- र्यास्ताची शोभा इतकी असते कीं, स्वर्गद्वारांतून स्वर्गाचीच जणूं शोभा आपण पहात आहोंत असा भास होतो.
 जुन्या करारावर टीका लिहिणाऱ्या लोकांनीं असें सांगितलें आहे कीं, 'माना' प्रत्येकाला आपल्या आवडीच्या पदार्थाप्रमाणें


१ स्पेन्सर २ हॅमर्टन.