पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२

 संभाषणकलेमध्ये माणसांत जितका कमीजास्तपणा दिसून येतो, तितका इतर गुणांमध्ये दिसून येत नाहीं. ज्यांच्या बरोबर संभाषण केलें असतां मन रमेल अशीं पुष्कळ हुशार माणसें माझ्या माहितींतलीं आहेत; पण त्यांच्या पासून ज्ञान निवळ काढून घेतल्याशिवाय मिळावयाचें नाहीं. चांगले सं- भाषण करणारा माणूस नेहमीं हवासा वाटतो. इतर गोष्टींप्रमाणें ही कला देखील व्यासंगानें कमावितां येते. अभ्यास केल्या- शिवाय कोणालाही नीट रीतीनें संभाषण करितां येणार नाहीं.
 सर वुइल्यम टेम्पल ह्मणतो – “चांगलें संभाषण चार गोष्टी मिळून झालेलें असतें”–पहिली गोष्ट - सत्य, दुसरी- समज, तिसरी -सुखभाव, चवथी- नक्कल करण्याची शक्ति. ह्यांपैकी पहिल्या तीन गोष्टी कोणाच्याही अंगीं असणें शक्य आहे. तरी पुष्कळ लोकांनीं बरेंच ज्ञान संभाषणापासून मिळविलेलें असतें. बेकन ह्मणतो–“जो वारंवार प्रश्न करील त्याला पुष्कळ ज्ञान मिळेल, व त्याचें बरेंच समाधान होईल. परंतु विशेषेकरून ज्याला प्रश्न करावयाचे त्याच्या ज्ञानाला अनुलक्षून प्रश्न विचारले तरच तें प्राप्त होईल. कारण, त्याच्या योगानें ज्याला प्रश्न विचाराव- याचे त्याला उत्तर देण्यास आनंद वाटेल, व जिज्ञासूंस सारखें ज्ञान मिळत जाईल."
 सौंदर्याचें खरें स्वरूप ओळखण्याची शक्ति मुलांत तर काय, पण आपणांत देखील आणण्यास पुरेसा यत्न आपण करीत नाहीं. व वास्तविक पाहिले तर इतकें शुद्ध, अनायासानें साध्य होणारें, मोल न पडतां मिळणारें, व नेहमीं आपल्या ठिकाणीं वास कर- णारें असें दुसरें तें कोणतें सुख ! सृष्टींतील देखावे, वृक्ष, दाट पालवी, फलपुष्पें, निळें आकाश, लोंकरीसारखे दिसणारे ढग, चकाकणारा समुद्र, सरोवरावरील वीचितरंग, नदीपात्रांवरील