पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०

भासतें, व जे जवळ असले ह्मणजे आनंद होतो, पण जवळ नसले झणजे वाईट वाटत नाहीं व दुःखही होत नाहीं अशा पदार्थो- पासून उत्पन्न होतें तें; ह्या सर्वोस खऱ्या सुखाच्या गोष्टी ह्मणतात."
 इंद्रियांपासून खरें सुख मिळतें, पण तें मिळविणें सर्वास मोठी भूति नव्हे. फ्लेतो आणखी असें लिहितो – “पेलिबस प्रतिपादित करितो कीं, चैन, मौज, आनंद व त्यांसारख्या इतर भावना मनुष्यमात्रास फायदेशीर आहेत खऱ्या; परंतु शहाणपण, ज्ञान, स्मरणशक्ति, तत्सदृश खरीं मतें, खरीं प्रमाणे इत्यादि गोष्टी ज्यांना त्यांचा आस्वाद घेणें शक्य आहे, त्यांना सुखापेक्षां जास्त श्रेयस्कर व इष्ट आहेत. तसेंच आज हयातीत असलेल्या व पुढें जन्मास येणाऱ्या सर्व मनुष्यप्राण्यांना त्या सर्वोत फायदेशीर आहेत."
 खरीं सुखें बहुतेक अगणित आहेत. सोयरींधायरीं व मित्र- मंडळी, शिळोप्याच्या गोष्टी, पुस्तकें, गाणेंबजावणें, कविता, कलाकुसरीचे पदार्थ, व्यायाम व विश्रांति, सृष्टिसौंदर्य व सृष्टिवै- चित्र्य, ग्रीष्म व शरदूऋतु, प्रातःकाळ व सायंकाळ, दिवस व रात्र, सूर्यप्रकाश व वादळ, अरण्यें व शेतें, नद्या, सरोवरें, समुद्र, प्राणिमात्र व वनस्पती, झाडें व फुलें, पानें, फळें सुखांपैकी केवळ कांहीं होत.
 “ईश्वरी प्रसादद्योतक पृथ्वीजन्य वस्तु आह्मांस मिळाव्या, ह्मणजे आह्मी त्यांचा उपभोग घेऊं अशी, जेव्हां आपण करुणा भाकितों, तेव्हां ईश्वराजवळून आपण सामान्यसा वर मागतों असें नव्हे.” “तशांत माणसाला सध्यां माहीत नाहींत अशा नव्या सुखांच्या गोष्टी पुष्कळ असणें देखील शक्य आहे. त्या सुधार - णेच्या उत्तम मार्गानें जातां जातां त्याला सांपडतीले."


१. मॉन्टेगा ह्याचें आयडीयल्स ऑफ लाईफ.