पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५९

समुद्र इत्यादिक उत्तम शिक्षक होत. पुस्तकांतून आपणां- पैकीं कांहींस जेवढे शिकतां येईल, त्यापेक्षां हीं जास्त शिकवि- तात. आणि विशेष हैं कीं, तुह्मी खेड्यापाड्यांत हवापालट क- रण्यास गेलां, होडींत बसून नदींत फिरलां, अरण्यांत फुलें वें- चिलीं, खाड्याखुड्यांतून खनिज द्रव्यें गोळा केलीं, समुद्रकि नाऱ्यावर शिंपा व जलज वनस्पति हीं जमा केलीं, क्रिकेट किंवा गोल्फ खेळलां, अथवा इतर कोणत्याही प्रकारचा व्यायाय केला व शुद्ध हवा घेतली, ह्मणजे तुमची शरीरप्रकृति सुधार- लेली दिसेल इतकेंच नव्हे, तर तुमची चिंता, काळजी, व दुःख हीं नाहींशीं झालेली, निदान बऱ्याच प्रमाणानें कमी झालेलीं तरी दिसतील. सृष्टि आपणांस शांत करिते, आपले डोके थंड करिते, व आपणांस हुशारी आणिते. ती आपलें मन अधिक शांत व आनंदी करिते.
 ऐषआराम व करमणुकीच्या गोष्टी ह्यांतच नुसतें आयुष्य घा लवूं लागलों, तर स्वार्थाकडे लक्ष दिलें असें होईल इतकेंच नव्हे, तर त्यांत अगदींच चव रहाणार नाहीं. खेळ ह्मणजे आयुष्यांतील इतिकर्तव्यता असें कदापि मानितां कामा नये, पण बेताबाताने उपभोगाई वस्तूंचा उपभोग घेणें ह्मणजे आळसांत वेळ घालविणें असें नव्हे.
 करमणुकीच्या गोष्टींत मुळाशीं काय पाहिजे ? ह्या जगांत सुर्खेही आहेत व सुखाभासही आहेत. प्लेतोनें प्रोतार्कसकडून सॉक्रेतिसाला प्रश्न करविला आहे. तो असा -- “सॉक्रेतिसा, खऱ्या सुखाच्या गोष्टी त्या कोणत्या ?" त्यावर सॉक्रेतिसानें उत्तर केलें—“सुंदर मानिलेले रंग व आकृती पाहून जें सुख होतें तें, नानाप्रकारचे गंध घेऊन व आवाज ऐकून ज्या सुखभावना होतात त्यांपैकी बहुतेक, ज्या पदार्थांचें अस्तित्व आपणांस