पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८

वाटतात, व देखावा इतका आश्चर्यभरित आणि वन्य दिसतो कीं, स्वप्नावस्थेंतल्या रंभाअप्सरादिकांच्या निवासस्थानाप्रमाणें तो वाटतो.
 हवा बिघडली आहे असें आपण वारंवार ऐकतों, पण वस्तुतः वाईट हवा ह्मणून नसतेच. हवा सर्वखीं आनंदकारकच असते, मात्र ती निरनिराळ्या रीतीनें आनंदकारक वाटते. हवा केव्हां केव्हां शेतकऱ्यांस किंवा शेतीभातीस वाईट असते, पण मनुष्य- प्राण्यास सर्वप्रकारची हवा चांगलीच. सूर्यप्रकाश आल्हादकारक वाटतो, पावसानें माणूस ताजातवाना होतो, वान्याच्या योगानें अंगांत कुवत येते, बर्फामुळे मन उल्हसित होतें. रस्किन झणतो — “वाईट अशी हवा मुळींच नाहीं; निरनिराळ्या प्रका- रची चांगली हवा असते एवढेंच.”
 विश्रांति ह्मणजे आळस नव्हे. ग्रीष्मऋतूंत एकाद्या झाडा- खालीं पाण्याचा झुळझुळ आवाज ऐकत, किंवा निळ्या आका- शांतून तरंगणारे ढग पहात, गवतावर पडलें ह्मणजे वेळ फुकट दवडिला असें कदापि होत नाहीं.
 आणखी, व्यायाम बहुशः उघड्या हवेंत घ्यावा, ह्मणजे दो- होंपासून होणारे फायदे तुह्मांस लाभतील. घोड्यावरच्या मांडी- सारखा शरीराच्या आंतील रचनेस फायदेशीर असा दुसरा व्या- याम नाहीं. रोज निदान दोन तासपर्यंत मोकळ्या हवेंत रपेट करणें हें प्रत्येकानें आपलें पहिलें पवित्र कर्तव्यकर्म मा- निलें पाहिजे.
 स्वच्छ हवेपासून शरीरास जेवढा फायदा होतो तेवढाच म नास होतो. मनुष्यमात्रास कांहीं गुप्त गोष्ट सांगावयाची आहे झणूनच की काय सृष्टि माणसांबरोबर बोलावयास पहातेशी नेहमीं भासते. आणि तिला गुप्त गोष्ट सांगावयाची आहे हेंही खरेंच
.  पृथ्वी, आकाश, अरण्यें, माळरानें, सरोवरें, नद्या, पर्वत,