पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५७

ल्पना मनांत खेळत असल्यामुळे ताऱ्यांप्रमाणें शोभणारीं पुष्पें न- दीकिनाऱ्यावर आपलीं डोकीं वर करून पहात आहेत; जणूं काय मार्गात अडथळा करणाऱ्या तृणराजीच्या संसर्गापासून दूर राहण्याची त्यांची इच्छा आहे. कुशाग्रबुद्धीच्या लोकांस अ- सल्या अडचणींस सतत तोंड द्यावें लागलें आहे. तो साधा रस्ता नानातऱ्हेच्या विचारांमुळे मला सुंदर भासत असे, व नभो- मंडळांत तारागण चमकूं लागले ह्मणजे नदीकांठीं मी नेहमीं येऊन बसत असें.
नाहीं हें पुष्कळ वर्षे माझ्या लक्षांत आलें नाहीं. मला नवीन वस्तु नकोत; परिचयांतल्या आवडत्या वस्तु मला हव्यात. मला तीच वन्यपुष्पें, तेच वृक्ष, कोमल अॅश झाडांची हिरवीचार वनराजि, पारवे, व कावळे आवडतात; व शंकुयंत्रावर कांट्याची छाया पडण्यापुरता उजेड असेपर्यंत जो गागा गातो तो सोनारपक्षी मला आवडतो; कारण, त्याच्या गाण्यांत माधुर्य तसेंच आहे. विशेष, ह्या सर्व वस्तु मला त्याच ठिकाणी हव्यात. वसंतऋतूपासून ग्रीष्मऋतूपर्यंत येणारी सजीव प्राण्याची परंपरा व ग्रीष्मऋतूंतील सृष्टीचा चित्रमहाल हीं मला आवडतात. प्रत्येक वर्षी तीच परंपरा मीं पहावी अशी माझी इच्छा आहे.”  स्विझर्लन्दमधील कुरणांत जशीं असंख्य जातींचीं फुलें असतात, तशीं आपल्या येथें नाहींत; पण मधून मधून आपल्या येथील कुरणें बटरकप पुष्पांनीं द्योतित झालेलीं असतात.

 "व तीं रुप्याप्रमाणें चकाकणाऱ्या लेडीस्मॉक फुलांनी गजबजून गेलेलीं असतात,” आणि अरण्ये तर अधिक सुंदर व मनोवेधक


१. शेक्सपीअर.