पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६

 शुद्ध पाण्याचे आपण किती ऋणी आहोंत ह्याबद्दल बरेंच लि- डून गेलें आहे; पण शुद्ध हवेचे आपण तितकेच ऋणी आहोत. हवा किती आश्चर्यजनक आहे ! हवा आपल्या शरीरांत भिनून गेली आहे. तिनें आपल्या कांतडीभोंवतीं इतकें नाजूक आंत- रिक द्रव्य पसरलें आहे कीं, तें आहे किंवा नाहीं ह्याचें आप- ल्यास भान नसतें. तरी त्या द्रव्याच्या अंगीं इतका जोर आहे कीं फलपुष्पांचा सुगंध आपल्या खोलींत तें वाहून आणितें; त्या- च्यामुळे आपलीं गलबतें समुद्रांत चालतात, व पर्वतावरील आणि समुद्रांतील स्वच्छ हवा आपल्या अगदीं शहरांत येते. हवा शब्दप्रचालक होय. ज्यांच्यावर आपण प्रीति करितों त्यांचे शब्द व सृष्टींतील मधुर ध्वनि ती आपल्या कानांवर पा- डिते; पृथ्वीवर जल वर्षणाऱ्या मेघाचा ती एक खजिना होय. हवा दिवसां सूर्याचा ताप कमी करिते, व रात्रीं थंडी कमी क रिते; निळ्या रंगाच्या कमानीसारख्या प्रकाशमान नभोमंडलानें ती आपणांस व्यापून टाकिते; आणि प्रभातसमयीं व संध्या- समयीं आकाशास रक्तिमा आणिते. ती अनुपम रीतीनें मृदु, शुद्ध, तशीच सौम्य असूनही इतकी उपयोगी आहे कीं, सृष्टीनें निर्माण केलेल्या सर्व भूतांपेक्षां एरियल भूत अतिशय नाजूक, आल्हादकारक व मनोहारक आहे ह्यांत आश्चर्य नाहीं.
 जेफ्रीज ह्मणतो–“सर्व वस्तूंमध्यें आरामकारक हवेसारखी दु- सरी गोड वस्तु नाहीं. ती अॅफ्रोडाइट देवतेच्या बाहूंप्रमाणें वेष्टून असणारें व सर्वत्र पसरलेलें असें एक मोठें पुष्पच होय. जणूं काय घुमटाकार हैं आकाश घंटाकृति पुष्पाप्रमाणे असून तें आ- पल्या डोक्यावर लोंबकळत आहे; व त्याचा मनोवेधक मकरंद पृथ्वीचा सर्व पृष्ठभाग भरून टाकीत आहे. वन्यपुष्पांचा गंध- वाह सर्वांत मधुर होय. आपल्या जीवनहेतूच्या उदात्त क-