पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५५

ग्यतेच्या इंद्रियांनीं कार्यसाधकरीतीनें जुटीनें काम करून शुद्ध केलेलें पुरेसें रक्त त्यांस हवें हें जितकें खरें आहे, तितकेंच तें मेंदूस हवें हेंही खरें आहे. तशांत, जीवनकलहामुळे मेंदूस पु- ढारीपणा आला आहे, व तो नेहमीं गरीब मदतनीस जीं इतर इंद्रियें त्यांस मागें टाकितो. उत्तम व्यवस्थित काटकसरीनें में- दूचा उपयोग केला, तरी हैं अचाट यंत्र सुरू केल्यापासून तों थकवा येई त्या क्षणापर्यंत खऱ्या कामाचा वेळ अगदीं मर्यादित असतो. मीं आपल्यापुढें जे विचार मांडिले आहेत त्यांत स- त्यांश असल्यास, तो वेळ वाढविण्याचा खरा मार्ग मेंदूस जास्त तरतरीत करणें हा नव्हे, तर अंगीभूत जीं इतर इंद्रियें, त्यांस उत्तेजन देऊन त्यांच्या कार्यसाधक सहाय्याने थकव्याचा वेळ लांबणीवर टाकणें हा होय."
 मृगया करणें, निशाण मारणें, मासे धरणें इत्यादींस नेहमींच्या बोलण्याच्या प्रचारांत क्रीडा असें मानितात. आमच्या- पैकीं जे लोक शिकारी कुत्रे बरोबर घेऊन पारधीस जात नाहींत, किंवा बंदुकीनें शिकार मारण्यास जात नाहींत, अथवा मासे धरीत नाहींत व अशा रीतीनें व्यायाम आणि करमणूक करून घेत नाहींत, त्यांचें देखील मन त्यांकडे ओढतें. ही इच्छा आपल्या पूर्वजांपासूनच आपणांत खिळून गेलेली आहे. पूर्वी बऱ्याच प्रमाणानें आमचे लोक शिकार करून आपली उ- पजीविका करीत; व शिकार करणें ही इतिकर्तव्यता मानीत इतकेंच नव्हे, तर पुढील लोकांत तेंच उत्तम सुख समजत. ओसिअन ह्मणतो. – “रानडुकर त्यांचीं थडगीं तुडवीत जातो, पण त्यामुळे त्यांचा विश्रांतिभंग होत नाहीं; तारुण्यांतला हा खेळ त्यांना अद्यापि आवडतो; व मोठ्या आनंदानें वायुरूपी अश्वावर ते आरूढ होतात. "