पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४

दोन तरी मोडतातच असें आढळून येईल. ते गुण १ अनिश्चि- तपणा, २ विस्मयास जागा, ३ नित्यनेमाच्या धंद्याशिवाय इतर गोष्टींत कौशल्य प्रकट करण्यास अवकाश हे होत. या तिन्ही गुणांचा योग्यपणा मुख्यत्वेंकरून पुढील गोष्टींमुळें ठरतो. त्यांच्या योगानें शारीरिक श्रम करणाऱ्या बहुतेक लोकांच्या नेहमींच्या व्यवसायांत अगदीं भिन्न असें मनाला गोड वाटणारें क्रमान्तर होतें; व नेहमीं फारसा उपयोग होत नसल्यामुळे ज्या शक्ति व जो आनंदी स्वभाव कमीकमी होत जाऊन शेवटीं समूळ नष्ट होण्याचा संभव आहे, त्यांना प्रचलित करण्यास अवकाश सांपडतो.”
 रॉयल सोसैटीचा चिटणीस प्रोफेसर मायकेल फॉस्टर नु- क्च दिलेल्या रीडव्याख्यानांत असें ह्मणतो - "शारीरिक श्रम केल्यामुळे जो थकवा येतो, तो मुख्यत्वेंकरून मेंदु थकल्यामुळें येतो; आणि ज्याशीं स्नायूंचा फारसा किंवा मुळींच संबंध नाहीं असा मेंदूचा थकवा असतो हेंही आपणांस माहीत आहे. मेंदूच्या व्यापारामुळे, तसेंच स्नायूंच्या व्यापारामुळे, शरीरांतील रसायनद्रव्यांत फेरफार होतात; मेंदूमध्यें जे रसायनद्रव्याचे फेरफार होतात, तस- ल्याच प्रकारचे स्नायूंमध्यें होतात; कदाचित् बारीकसारीक गोष्टींत थोडासा भेद असेल; व स्नायूंतील फेरफारांबरोबर मेंदूतील फेर- फारांची तुलना केली तर मेंदूंतील फेरफार कमी दिसतात; परंतु मेंदूंतील मज्जातंतुमय द्रव्याच्या अतिशय नाजूकपणामुळें तो कमीपणा भरून निघतो, किंवा त्यांचें मान ज्यास्त होतें, एवढेच कायतें आपल्या सर्व ज्ञानावरून आपणांस कळतें. “ काम करण्याच्या शक्तीचा सांठा पुनः लवकर भरून निघावा, च शरीरास इजा करणारे त्यांत उत्पन्न झालेले पदार्थ बाहेर निघून जावेत, अतएव स्नायू सजीव राहण्यासाठीं कमी यो-