पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५३

असतात. खेळ केवळ करमणुकीदाखल खेळा, जन्माचें कर्तव्य ह्मणून खेळूं नका.
 आरोग्य राखण्यास खेळ किती महत्वाचे आहेत हें दाखवि- ण्याकरितां शारीरशास्त्रावर अधिकारानें बोलणाऱ्या दोन मोठ्या विद्वानांच्या मतांचे उतारे देतों. सर जेम्स पेजट ह्मणतो- "क- रमणुकीच्या गोष्टींस कारणीभूत होणारे सर्व मुख्य गुण खेळांत विशेष रीतीनें सांपडतात. परंतु ह्याखेरीज कामधंद्यांत व नेहमीं- च्या व्यवसायांत त्यांपासून मनाला अप्रत्यक्ष रीतीनें बहुमूल्य असें नेकीचें वळण येतें. कारण, संघानें पैसा मिळविण्याची इच्छा न होतां किंवा क्षुद्र हेतु मनांत नसतां केवळ मनोरंजनासाठी लहान मोठे एकत्र जमून जुटीनें काम करितात; इमानानें मन लावून काम करणाऱ्या भागीदारांबरोबर सत्कर्मे करण्यास लहानमो- ठ्यांस शिकवितात; आयुष्यांतील प्रत्येक स्थितीत एकोप्यानें काम करण्याची योग्यता ही एक बढती करणारी मोठी शक्ति होय; ही शक्ति खेळांपासून अंगीं येते. जरी स्वभावतः नव्हे, तरी प्रघात पडून गेल्यामुळे खेळांपासून माणूस न्यायानें वाग- ण्यास शिकतो. कोणत्याही खेळांत कशीही चढाओढी असली, तरी लबाडीचा खेळ सर्वोच्या मतें लज्जास्पद ठरलेला असतो; आणि ज्यांना खेळांत न्यायानें वागण्याची संवय असते, ते व्यवहारांतही त्याचप्रमाणें वागण्यास अधिक प्रवृत्त होतात. क रमणुकीच्या गोष्टींत सचोटीचें मान मोठें असलें, तर ज्या बा- रीकसारीक वाईट गोष्टी कायद्याचे तडाक्यांत सांपडत नाहींत अशांचा तिरस्कार करण्यास लोकांना शिकविण्यांत खेळ बरेच सहाय्यकारक होतात. आतां ज्या विशिष्ट गुणांवर मर्दुमकीच्या खेळांचा उपयुक्तपणा मुख्यत्वेंकरून अवलंबून असतो, अशा गुणांचा विचार करूं लागलों तर त्यांमध्ये पुढील गुणांपैकी एक