पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग ४.


करमणूक.


 अति काम व करमणूक मुळींच नाहीं असें झालें, ह्मणजे मु- लगा मंद होतो अशी एक ठरींव ह्मण पडली आहे. आणि तें काम घरांत बसून करावयाचें असलें, तर मग मुलगा नाजूक प्रकृतीचाही होत जातो व तारुण्याच्या भरांत देखील निःसत्व रहातो. खेळांत घालविलेला वेळ फुकट घालविलासा होत नाहीं. खेळ शरीराच्या वाढीस उपयोगाचे आहेत. विशेषकरून छातीकडला व बाहूंकडला भाग त्यांच्या योगानें विस्तृत होतो. आपल्या नेहमींच्या कामकाजानें छाती व बाहू भरण्याऐवजीं आकुंचित होत जातात.
 खेळांच्या योगानें माणसाची शरीरप्रकृति चांगली रहाते इत- केंच नव्हे, तर त्यांपासून काम करण्यास हुशारी येते. बारीक- सारीक गोष्टींत आपलेंच घेऊन न बसणें, सचोटीनें वागणें, व ऊंस गोड लागला ह्मणून मुळासकट न खाणें इत्यादि लोकांशीं व्यवहार करण्याच्या गोष्टी खेळांपासून कळतात.
 खेळांपासून आरोग्य प्राप्त होतें, तशीच नीति कायम रहाते. साहस, सोसकपणा, आत्मसंयमन, व मनमिळाऊ स्वभाव, जे पुस्तकी विद्येनें प्राप्त होत नाहींत व शिकवितां येत नाहीत, ते खेळांमुळे अंगीं येतात. वॉटर्लची लढाई जिंकली ती इटन शाळेच्या मैदानांत जिंकली असें वेलिंगटन ह्मणाला तें बरोबर आहे. सार्वजनिक शाळेत जाऊन मुले जे उपयोगाचे व महत्वाचे धडे शिकतात, त्यांपैकीं बरेच खेळण्याच्या मैदानांत शिकलेले