पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५१

 आणखी एक आज्ञा त्यांना आहे – “ तुह्मी चांगलें करा; सत्कृत्यरूपी संपत्ति तुमच्या जवळ असूं द्या; आपलें वित्त इतरांस देण्यास तयार असा; व इतरांशीं चांगल्या भावानें वागण्यास तयार व्हा. "
 “शाश्वत लोक मिळावा एतदर्थ भावी कालाचा पाया ह्मणून चांगली तयारी करा."
 “संपत्तीची तृष्णा हें पापाचें मूळ, संपत्ति पापाचें मूळ नव्हे असें पवित्रशास्त्र सांगतें. पैसा वाढूं लागला ह्मणजे त्याबद्दलचा लोभ वाढूं देऊं नका.”
 पर्वतावर ख्रिस्तानें आपल्या शिष्यांस दिलेल्या सर्मनमध्यें दे- खील पापाचें मूळ तेंच सांगितलें आहे.
 “इहलोकांतील संपत्ति मिळवून ठेवू नका; येथें तिला वा- ळवी लागते. नाण्यांना गंज चढतो; किंवा चोर पेट्या फोडितात व लुटतात.
"  “स्वर्गातील संपत्ति मिळवून ठेवा. तेथें वाळवीही लागत नाही, किंवा गंजही चढत नाहीं. चोर पेट्या फोडीत नाहींत, किंवा लुटीत नाहींत. ज्या ठिकाणीं तुमची संपत्ति त्या ठिकाणीं तुमची आशा गुंतलेली.”