पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४९

माझें कांहीं जात नाहीं, व असे असूनही मला कांहीं मिळेल ह्या आशेनें माझें समाधान होऊन मला आल्हाद होतो.
 कार्मायडीज जें ह्मणाला त्यांत तथ्यांश बराच आहे; पण तें सर्वाशीं खरें नाहीं. व जेव्हां तो हें बोलला, तेव्हां तो जेऊन तृप्त झालेला होता व गाणें ऐकून गार झालेला होता.
 पैशाचा शहाणपणानें उपयोग केला तर बराच फायदा होतो. कनक ही एक आदिशक्ति होय. एका विनोदी फ्रेंच गृहस्थानें ह्मटलें आहे –“पैसा राजाचा राजा आहे." जे हवें तें मिळवून देण्यास पैसा हें साधन आहे. स्वच्छ हवा, चांगलें घर, पुस्तकें, गायन इत्यादि वस्तु भोगार्ह आहेत असे कबूल केलें तर पैसा त्या मिळवून देतो. फुरसत असणे फायदेशीर आहे; ती पैसा मिळवून देतो. पृथ्वीवर प्रवास करणें सुखकारक आहे; तो प्रवास पैशानें करितां येतो. आपल्या मित्रांस मदत करणें, दुःखितांचें संरक्षण करणें इत्यादि गोष्टी विशेष हक्कासारख्या आहेत; त्या पैशामुळे शक्य होतात. स्विफ्ट ह्मणे - " पैसा बाळगून ठेवा. पण डो- क्यांत, हृदयांत ठेवू नका."
 कृपण पैशाचा पैसा ह्मणून लोभ करितो. तो काटकसर वि कोपास नेतो. तो माणूस लोभ करणाऱ्या एकाद्या यंत्राप्रमाणेंच होय. ह्या जगांतील लहानसहान व क्षुद्र चिंतेपासून अलग रहावें. हाच धडा जगांत आपणांस शिकावयाचा आहे. पैशाचा लोभ करणें हें अतिक्षुद्र होय.
 पैशाचा शहाणपणानें उपयोग करण्यांतच कर्तबगारी आहे. सॉलोमन ह्मणतो – “कांहीं लोक पैसा पाण्यासारखा खर्चितात तरी त्यांचा वाढतो, व कांहीं पैशाला वाजवीपेक्षां फाजील जपतात तरी त्यापासून दारिद्र्य येतें.”