पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८

(विचार) आहेत, त्यांनाच मात्र पैशानें लादलेल्या खेंचरास रज देतां येते.”
 पैशाबद्दलचे आपले उद्गारच अन्वर्थक आहेत. तो मनुष्या पैसा करितो आहे, अमुक असामीनें पैसा केला आहे, अथवा तो संपत्तींत लोळत आहे इ० आपण ऐकतों. पण अमुकजण “संपत्ति भोगीत आहे” असें आपण कधीं ऐकिलें नाहीं. जे कोणी पैसा करितात तो त्यांच्या स्वतःसाठीं नव्हे. “तो पैशाच्या राशी करितो; पण तो कोण भोगील हे त्याला कळत नाहीं."
 क्झेनोफनच्या जेवणाच्या वर्णनांत कार्मायडीज असे प्रति- पादन करितो कीं, संपत्तीपेक्षां दारिद्र्य बरें. कारण, आपण सुरक्षित आहोंत हा विचार जिवाची भीति बाळगण्यापेक्षां बरा, हें सर्वास कबूल आहे. त्याचप्रमाणें गुलामगिरींत असण्यापेक्षां स्वतंत्र असणें बरें. आपल्या देशानें आपणांवर विश्वास ठेवावा हें, आ- पणांवर विश्वास ठेवूं नये, ह्यापेक्षां बरें. परंतु मी जेव्हां ह्या शह- रांत श्रीमंत होतो तेव्हां माझें घर कोणी फोडील, अथवा माझे पैसे लुटील, किंवा इजा करील, ही मला पहिली काळजी होती. आतां मला स्वस्थ झोंप येते. मला पॅरिसचें काम करावयास नको. मी इतका श्रीमंत नाहीं, तेव्हां सरकाराला माझ्याबद्दल वहीम यावयास नको. वाटेल तर शहरांत रहावें, नाहींतर निघून जावें, अशी मला पूर्ण मोकळीक आहे. मी श्रीमंत होतो तेव्हां सॉक्रेतिसाबरोबर अथवा इतर कोणा विद्वानाबरोबर मैत्री केली ह्मणून लोक मला नांवें ठेवीत असत. आतां मला वाटेल त्याला मीं सोबती ह्मणावें. कारण, मी गरीब झाल्यामुळे कोणी माझी पर्वा करीत नाहीं. जेव्हां मजजवळ फार पैसा होता तेव्हां भी फार दुःखी होतों. कारण, नेहमीं माझें कांहींनाकांहीं जात असे. आतां मी गरीब झालों आहे. मजजवळ कांहीं नसल्यामुळे