पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४७


भारानें वांकणाऱ्या गाढवाप्रमाणें तूं आपली संपत्ति फक्त प्रवा- सापुर्ती वाहून नेत आहेस; व मृत्यु तें ओझें उतरवून घेण्यास तयार आहे.""
 “पुढें उपयोगी पडेल ह्मणून कवडी कवडी करून पैसा सां- ठविण्याच्या काळजीत आपले आयुष्य कां घालवावें ? व्याधीनें पीडित झाल्यावर कंटाळलेल्या हृदयास त्यापासून काय आनंद व आराम होणार ? त्यामुळे आयुष्य एक पळ तरी वाढेल काय ? अथवा मरणाचा वेळ सुखाचा येईल काय ? ","
 पैशामुळे लोभ वाढण्यास सूट मिळते. ऑलिव्हर वेन्डेल होम्स हा त्याच गोष्टीचें खोंचदार वर्णन करितो.
 "मला सोन्याची किंवा मालमत्तेची फारशी जरूरी नाहीं. एकाददुसरें गहाणपहाण असावें, बँकेत बराचसा पैसा असावा, प्रॉमिसरी नोटस् असाव्या, अथवा रेल्वे कंपनीचे लहानसहान शेअर्स असावे ह्मणजे झालें. आपल्याला पुरून उरण्याजोगें नशीबानें द्यावें ह्मणजे आपली भूक निवाली."
 सेनिका ह्मणतो—“गरीब माणसाला पुष्कळ गोष्टी हव्या असतात, परंतु लोभ्याला सर्वच हव्या असतात.”
 ह्या जगांत नाणीं नसतीं, किंवा हांजी हांजी करण्यास लोक नसते, तर एकमेकांवर उपकार करणारे लोक बरेच निपजले अ- सते अशी एक वक्रोक्ति आहे.
 बेकन ह्मणतो- “पैसा मिळविण्याचा सारखा व अश्रांत यत्न करण्यांत ज्यांना मोठमोठालीं कामें करावयाची असतात त्यांचा बराच वेळ मोडतो." जिवाला सुखाची भर झाली तर पैसा बरा; पण पैशाला भर घालणारें आयुष्य नको. गरीबी ही विद्याव्य- सनी लोकांची भार्या मानिली आहे.' “ज्यांच्याजवळ सपक्ष रथ


१ शेक्सपीअर. २ गे. ३ एमर्सन.