पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६

बिशप वुइलसन् ह्मणतो- “लक्ष्मी जवळ असली ह्मणजे बहुधा माणसाला काळजी लागते इतकेंच नव्हे, तर यातना उत्पन्न होतात.”
 लक्ष्मीमुळे पुष्कळ माणसें निःसंशय धुळीस मिळालेलीं आहेत. तारतम्यदृष्टीनें विचार केला तर गरीबांपेक्षां श्रीमंतांस पैशाब- द्दल विशेष काळजी वाटते. पैशापासून फक्त शहाण्या माणसांनाच सुख होईल, इतरांस होणार नाहीं. ज्याला पैसा मिळविण्याची फाजील उत्कंठा, तो सदाचा दरिद्री. रस्किन ह्मणतो- “लहा- नशा खोपटांत राहून आश्चर्य उत्पन्न करणारी वस्तु ह्मणून वॉक राजवाडा असावा हैं, वारीक राजवाड्यांत राहून आश्चर्य वाट- ण्याजोगा पदार्थच जगांत नसावा, ह्यापेक्षां अधिक चांगलें होय. "
 लक्ष्मीचा खरा उपभोग घ्यावयाचा असला तर तिच्यावर विशेष आसक्ति ठेवू नका. सादी ह्मणतो- “पोटास पुरेसें अन्न असलें तर तें तुह्मांला वाहून नेईल; जास्त असलें तर तें तुह्मांला वाहून न्यावें लागेल.”
 “ मी उंटावर कधीं बसत नाहीं खरा, पण माझ्या मनावर कसलें ओझें नाहीं. मला प्रजा नाहीं, किंवा मी त्रासांत पडलेला नाहीं; पण मी कुणाला धनी ह्मणत नाहीं. मला उद्यांचा विचार नाहीं, अथवा गत दुःखाची मी आठवण करीत बसत नाहीं. अशा रीतीनें जीवनकलहांतून मुक्त होऊन मी शांत- चित्त रहातों.”
 बेकन ह्मणतो- “वासना करण्याजोग्या वस्तु थोड्या असणें व भयप्रद वस्तु पुष्कळ असणें असली मनाची स्थिति फार वाईट होय."
 “जरी तूं श्रीमंत असलास तरी तूं गरीबच. कारण, सोन्याच्या


१ सादी.