पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४५

 पुस्तकें विकत घेण्यास दौलत हवी काय ?
 वाचतां येतील इतकीं पुस्तकें विकत घेण्याचें ज्याला सामर्थ्य नाहीं, तो खरोखर अगदीं गरीब असला पाहिजे. उत्तम उत्तम ग्रंथ, बैबल, शेक्सपीयर, मिल्टन इ० आतां अगदीं क- वडीच्या मोलांत मिळतात.
 दौलतीमुळे आरोग्य, बुद्धि, मित्र, सौंदर्य व सुखी आश्रम हीं मिळतात काय ?
 कॉनफ्युसिअस् ह्मणतो- डयूक ऑफसे फारच श्रीमंत होता; पण तो कोणालाही आवडत नसे. पेकी उपासमारानें मेला; व लोक अद्यापि त्याच्या मरणाबद्दल हळहळतात.
विशेष-  दौलतीमुळे सुख मिळतें काय ? जगाचा अनुभव घ्या. बाहेरून आनंदी दिसणारी किती माणसें दुःखी असतात ! पैसेवाली किती माणसें दुःखांत असतात ! मला असल्या माणसांचा बडेजाव नको व त्यांचें दिखाऊ सौख्य नको, किंवा अंतस्थ दुःखावरलें तें भप- केदार आवरणही नको.
 बेकन ह्मणतो -संपत्तीच्या धुंदींत असलेल्या माणसांना स्व- तःचें भान रहात नाहीं; व ते व्यवहारांत गढून गेले असतां त्यांना मानसिक व शारीरिक संपत्तीकडे लक्ष देण्यास फुरसत नसते.
 बिड्या त्या बिड्याच; मग त्या सोन्याच्या कां केलेल्या असे- नात. लक्ष्मीपासून मनाला पुष्कळ आधि लागतात, ह्यांत कांहीं संशय नाहीं. गरिबींत जशी माणसास काळजी असते, त्याचप्रमाणें श्रीमंतीतही निराळीच काळजी असते. पुष्कळ श्रीमंत लोक लक्ष्मीचे दास बनलेले असतात; लक्ष्मी त्यांची दासी होत नाहीं.


१ यंग.