पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२

तेक तत्वज्ञांनी व्यापारउदीम करणारांस नांवें दिलीं आहेत. निदान ते व्यापारउदीम ह्यालाच मुळीं हलक्या प्रतीचा व बहुतेक हीनत्व आणणारा मानीत असें ह्मटले पाहिजे. प्लेतोनें आपल्या कल्पित प्रजासत्ताक राज्यामध्यें व्यापाऱ्यांना नागरिक जनांचे हक्क दिले नव्हते. असला नीचप्रतीचा धंदा कोणीं करूं नये, व कोणास करावासा वाटलाच तर तो परदेशीयांनीं करावा असा त्याचा समज होता. व्यापारधंदा करण्याची पुष्कळ लोकांस जरूरी आहे; तेव्हां स्वभावावर त्यापासून घडणारे सं- स्कार जर अवश्य अपायकारक असले, व बुद्धीच्या वाढीस चाल- णारे नसले तर ही एक फारच वाईट गोष्ट होय. पण ते संस्कार वाईट नाहींत हैं एक सुदैवच ह्मणावयाचें. आतां इतकें मात्र खरें कीं, व्यापारधंद्यांत गुंतलेल्या माणसांना फुरसतीच्या वेळीं मात्र इतर गोष्टींकडे लक्ष देतां येतें. भाषाज्ञान व शास्त्रे ह्यांचा अभ्यास करणाऱ्या माणसांचीं फक्त उदाहरणें घेतलीं, तरी धंदा संभाळून अभ्यास करणारी माणसें बरींच आढळतात. नॅसमिथ हा कारखानदार असून त्याला खगोलविद्या अवगत होती. ग्रोट हा पेढीवाला असून त्यानें इतिहास लिहिला. सर जे इव्हॅन्स हा कागद तयार करणारा होता; तरी प्राचीनशास्त्रकलोद्दीपक समूहाचा तो अध्यक्ष व रॉयल सोसैटीचा तो खजीनदार होता. प्रेस्टीच हा व्यापारी असून ऑक्सफर्ड येथील विश्वविद्यालयांत भूगर्भशास्त्राचा अध्यापक होता. रॉजर पेढीवाला, पण त्याला कवित्वशक्ति होती. त्याचप्रमाणे प्रेड हा होता. आत्मश्लाघेचा दोष येत नसला तर माझ्या पूज्य वडिलांचें नांव सांगावयास हरकत नाहीं. ते पेढीवाले असून त्यांना गणित चांगलें येत असे, ते पुष्कळ वर्षेपर्यंत रॉयल सोसैटीचे उपाध्यक्ष होते. अशीं आणखी उदाहरणें देतां येतील.