पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हारांत मागे पडलेले पुष्कळ लोक मला माहीत आहेत. त्यांच्या- बद्दल विचार केला तेव्हां मला असें आढळून आलें कीं, ते मागें पडण्याचें मुख्य कारण हाटलें ह्मणजे ते धरसोडपणा करीत, व अनियमितपणें वागत. सर्वांशी मिळून काम कसें करावें हें त्यांना माहीत नसे, व ते बारीकसारीक गोष्टींबद्दल हेका धरून बसत. सारांश, त्यांच्या अंगीं व्यवहारज्ञान कमी होतें.
 लहानमोठ्या सर्व गोष्टींत व्यवस्था व शिस्त ह्यांची विशेष जरूरी आहे. योग्य ठिकाणीं योग्य वस्तु लावून ठेवणें हा नियम अमूल्य आहे. वस्तूचें काम झाल्यावर ती जागच्या जागीं लाव- ण्यास थोडी मेहनत घेतली, ह्मणजे पुनः जेव्हां ती लागते तेव्हां बराच वेळ वांचतो. क्झेनोफन ह्मणतो- “ ज्याप्रमाणें एकाद्या शेतकऱ्यानें धान्याच्या कोठींत गहूं, बाजरी, वाटाणे इ० एकाच ठिकाणी ओतून ठेवावे, व गव्हांची चपाती, बाजरीची भाकर, किंवा वाटाण्याची आंबटी करावीशी वाटली कीं, एकएक दाणा निवडून काढावा, तसाच प्रकार अव्यवस्थेचा आहे." तोच ग्रंथकर्ता उदाहरणार्थ एका जहाजासंबंधीं उतारा देतो. “ईश्वरी सत्तेनें समुद्रांत वादळ सुरू झालें कीं, जें पाहिजे तें शोधण्यास व ज्याचा उपयोग करणे कठीण पडतें तें देण्यास वेळ नसतो; कारण, देवांना निष्काळजी माणसांचा राग येतो व त्यांना ते शिक्षा करितात; आणि ज्यांच्या हातून मुळींच चूक झाली नाहीं अशांचा देखील जर ते नाश करीत नाहींत, तर त्यांत त्यांनी आनंद मनिला पहिले. मानिला पाहिजे. व ज्यांनी सर्व वस्तु आहेत अशांना शिक्षा झाली नाहीं, तर त्यांनीं ईश्वराचे आभार मानिले पाहिजेत." ह्यास्तव प्रत्येक वस्तु व्यवस्थेनें लावून ठेवा. आरिस्तातलपासून तों कार्लाइलपर्यंतच्या सर्वांनीं नव्हे, तरी बहु-


१ क्नोकनचे इकॉनमिक्स.