पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४३

 माल स्वस्त मिळेल तेथें विकत घ्यावा, व जास्त किंमत येईल तेथें विकावा, ह्या तत्वाविरुद्ध कार्लाइल आवेशानें बोले. त्याला असें वाटे कीं, टिपून सांगतां येत नाहीं अशा रीतीनें कापसाची “कमत कमी किंमत" ठरवून ठेवावी. त्याचप्रमाणें इतर पदार्थांची किंमत ठरवून ठेवावी असेंही त्याचें मत असावेंसें दिसतें. व आपण ह्मणावें कीं, "सध्यां कापसाची किंमत कमी करण्याची आमची इच्छा नाहीं.” आपण इतर राष्ट्रांपेक्षा कमी किंमतीला पदार्थ विकूं नये. "गडे हो, आपण कमी दरानें पदार्थ विकणार नाहीं, इतर राष्ट्रांच्या दराप्रमाणें पदार्थ विकण्यांत आपण तृप्त असूं.” हें अशक्य आहे इतकेंच नव्हे तर खोटें आहे. सुती कापडाचा खप कमी झाला तर आह्मांला दाणा कमी घेतां येईल. कार्लाइल असें गृहीत धरितो कीं, कमी दर असला तर माल पुष्कळ संपेल; ह्मणून त्याच्या मताप्रमाणे चाललों तर पुष्कळ माणसें कपड्याशिवाय रहातील; तरी कपडे विकत घेण्यास ठ- रीव किंमत देण्याइतके पैसे त्यांच्याजवळ असणार नाहींत. त्याच्या मताप्रमाणें तोटा झाल्याशिवाय आह्मांला कापड कमी दरानें विकतां आलें, तरी आह्नीं विकूं नये. ह्मणजे इतर लोकांस कापडाशिवाय व आपल्या लोकांस अन्नाशिवाय ठेवावें. आपणांस जो पदार्थ स्वस्त तयार करितां येतो तो देऊन स्वस्त तयार करितां येत नाहीं तो घ्यावा, हा व्यापाराचा नियम आहे. ह्यास्तव जेथें माल स्वस्त मिळेल तेथें घ्यावा, व ज्यास्त किंमत येईल तेथें विकावा, हा नियम व्यापारास आवश्यक आहे; इतकेंच नव्हे, तर तो सर्वस्वीं फायदेशीर आहे. कारण, त्यामुळें ज्यांना माल विकावयाची जरूरी असते त्यांच्याजवळून तो आपणांस विकत घेतां येतो; व ज्यांना विकत घ्यावयाची जरूरी असते त्यांना विकतां येतो. दुसऱ्या रीतीनें व्यापार करणें ह्मणजे घाटावर नेऊन मिर्च्या विकावयाच्या ह्या ह्मणीप्रमाणे व्यर्थ होय.