पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०


दोन मिळून बेबीस देखील होतात. गणिताच्या दृष्टीनें २+२ चार होतात हें अगदी बरोबर आहे; पण संसारांत तें चुकतें. ह्या धड्याचा भलत्याच ठिकाणीं उपयोग केल्यामुळे पुष्कळ होतकरू माणसें नाश पावलीं आहेत.
 जें कांहीं होतें तें सर्व शांतपणे सोसा. चेहरा का - ढीपर्यंत लॉर्ड ब्रूहमला स्थिर बसतां येत नसे, ह्मणून त्याचा फोटोग्राफ नेहमीं बिघडे, असें सांगतात. बॅगहाट ह्मणतो कीं, धंद्यारोजगारांत गुंतलेल्या बऱ्याच माणसांना एका खोलींत स्वस्थ बसतां येत नाहीं ह्मणून अपयश येतें. धंद्यारोजगारांत पडण्याची इच्छा नसली, तरी प्रत्येक माणसामागें एका अर्थी कांहीं तरी धंदा लागून असतोच. आपणां सर्वाना कर्तव्यकर्मे आहेत. को- णाला घरसंसार पाहावयाचा असतो, तर कोणाला खर्चवेच करावयाचा असतो. व मोठ्या गोष्टी जशा कठीण व त्रासदायक असतात, तशाच कधीं कधीं लहानसहान गोष्टीही असतात.<बर >  धंदारोजगार चांगल्या रीतीनें चालवितां येणें हें बुद्धीपेक्षां व्यवहारिक ज्ञान, खबरदारी व लक्ष्य ह्यांवर विशेष अवलंबून आहे. " 'दुकान चालवा, ह्मणजे तें तुमची पोटगी चालवील " अशी एक जुनी ह्मण आहे. क्झेनोफन अशाच अर्थाची एक गोष्ट सांगतो. "एक देखणा घोडा लवकर लठ्ठ व्हावा अशी इराणच्या बादशहाची मर्जी लागली. तेव्हां ह्या विषयाबद्दल ज्यांना माहिती असावीसें वाटत होतें, अशांपैकी एकाला त्यानें घोडा कोणत्या प्रकारें अति लवकर लठ्ठ होईल असें विचारलें. त्यावर त्यानें उत्तर दिलें, त्याच्या धन्याच्या लक्षेकरून.”
 रोखचोख व्यवहार ठेवण्याची संवय वाढत वाढत लावून घेणें फार महत्वाचें आहे. थोडक्याच काळापूर्वी माझ्या एका मित्रानें सांगितलें कीं, चांगले बुद्धिमान्, शुद्ध वर्तनाचे, तरी पण व्यव