पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३९


गधंदा सोडला. त्यांना आयती पुंजी मिळाली, किंवा ते अकाली मेले. बाकीच्या आठशेंपैकीं सहाशें जणांची-कांहींची साधारण व कांहींची बरीच - बढती झाली. फक्त छप्पन असामी अगदीं बुडाले. ह्यांपैकी पंधरा असामी परीक्षेत मुळींच उतरले नाहींत. दहा अनियमितपणामुळें किंवा बाहेरख्यालीमुळे खचले. व ह- जारापैकी फक्त पंचवीस हातचीं नव्हत अशा कारणांमुळे ना- शास पावले. वैद्यकीच्या धंद्याप्रमाणें इतर धंद्यांतही तुझी उप- योगाचे असलांत, तरच लोक तुमचा उपयोग करून घेतील, ह्याविषयीं खात्री असूं द्या.
 वस्तुतः शरीरास खरोखरी जरूर असणाऱ्या वस्तूंबद्दल को- णासही फारशी काळजी वाहावयास नको. शरीरप्रकृति चांगली चैनीचे पदार्थ फार खर्चाचे असतात. व फ्रँकलीननें तसेंच ह्यटलें आहे – “एका दुर्गुणामागें जेवढा पैसा लागतो, तेवढ्यांत दोन मुलें पोसतां येतील.”
 ड्यूक वेलिंग्टन जें शहाणपणानें ह्मणाला तें ध्यानांत ठेवा. "फार व्याज मिळणें ह्मणजे पैसा सुरक्षित असण्याची खात्री कमी.”
 अनेक धंदे एकाच वेळीं करण्याचा यत्न करूं नका. तुम्हांला कितीही चांगली माहिती मिळालेली असली, एकादी गोष्ट तुझीं कितीही बारकाईने पाहिलेली असली, तरी असें कांहींना कांहीं घड- ण्याचा संभव असतो कीं, ज्यामुळे पूर्वी केलेली अटकळ चुकते. शहाणे ह्मणविणारे व्यापारी व पेढीवाले चुका करितात. कामकाजांत वापरलेला समंजस माणूस आपला अजमास बहुतकरून बरोबर असावा इतकीच इच्छा करितो. दोन आणि दोन मिळून चार होतात हे आपण अगदी लहानपणीं शिकतों; पण दोन आणि