पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३७


लोकांत तिरस्कार, संशय, खोटे नाटे दोष, ह्या सर्व गोष्टी कडू वाटतात; पण कर्ज ह्या सर्व गोष्टींपेक्षां अतिशय कडू आहे. कधीं कर्ज काढू नका. तुह्मांस फक्त ५० सेन्ट्स मिळत असले, व आठवड्यांतून दुसरें कांहीं मिळण्याचा संभव नसला तर धान्य टिपरीभर विकत घ्या, तें भाजा व खाऊन रहा; पण कोणत्याही माणसाचें एका डॉलरचेंही कर्ज काढू नका."
 कॉन्डन ह्मणतो - " ह्या जगांत नेहमीं माणसांचे दोन वर्ग झालेले असतात. एक वर्ग पैसा जवळ बाळगून असणाऱ्या लोकांचा, व दुसरा वर्ग पैसा खर्चून टाकणाऱ्या लोकांचा : का- टकसरी व उधळे लोकांचा. घरेंदारें, गिरण्या, पूल, जहाजें वगैरे बांधण्याचीं कामें, ज्यांच्या योगानें माणूस ऊर्जित दशेस येऊन पोहचला आहे आणि सुखी झाला आहे अशीं कलाकुसरीची सारी कामें काटकसरी लोकांनीच केलीं आहेत; आणि उधळपट्टी करणारे लोक त्यांचे गुलाम बनले आहेत. असें व्हावें हा सृष्टिनियम व ईश्वरी नियमही आहे. कोणत्याही वर्गातील लोकांना उधळपट्टी करून, आळसांत वेळ घालवून, किंवा अविचाराचें वर्तन करून तुमचें कल्याण होईल असें जर मीं सांगितलें, तर मी खोटा टरेन.">
 प्लुतार्क ह्मणे—“इफिसस् येथील आर्तिमिस् देवीच्या देवळांत जे कर्जबाजारी आश्रय घेत असत, त्यांची आपल्या कर्जदारांपासून सुटका होई व त्यांस आसरा मिळे. पण काटकसरीचें देऊळ व आ- श्रयस्थान धीरमनस्कांना सर्वदा उघडें आहे; व तें त्यांना आनंद, मान, व मनाची बरीच शांतता देतें; तर कर्ज काढू नका, व कुणास देऊ नका. केवळ देवघेवीचा धंदा करावयाचा असल्यास द्या. कर्जी दिलेला तुमचा पैसा परत मिळणार नाहीं, व त्याब- द्दल बरा बोलही मिळणार नाहीं. कारण, कर्जबाजारी लोकांस