पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६

परंतु स्वतंत्र होण्याकरितां काटकसर करण्यांत मर्दुमकी आहे व तें योग्य कृत्य होय.
 नेहमीं हिशेब ठेवीत जावा, व तो मोठ्या काळजीनें ठेवावा. अर्धी अर्धीचा हिशेब ठेवण्यांत हांशील आहे असें माझें ह्मण नाहीं. पण पैशाचा व्यय किती होतो, व कोणत्या वस्तूस किती पैसे पडतात, हें जेणेंकरून आपणांस कळेल असा हिशेब ठेवावा. ज्या मनुष्याला ह्मणून आपलें उत्पन्न काय, व आपण व्यय किती करितों हें कळतें, तो उधळपट्टी करणार नाहीं. उधळे लोक आपण काय करीत आहोंत ह्याबद्दल डोळेझांप करून उधळप- ट्टीस आरंभ करितात. डोळे उघडे ठेवून नाशरूपी कड्यावरून कोसळण्याचे धाडस कोणी करणार नाहीं. करितां, तुह्मांला कसा- ही खर्च असला तरी तो आपल्या उत्पन्नाच्या आंतच ठेवा. प्रत्येक वर्षी, अगदीं थोडें कां होईना, पण कांहीं शिलकेस टाका. कांहीं करा, पण कर्जबाजारी होऊं नका. डिकन्स ग्रंथकर्ता ह्म- णतो (हे विचार जरी तो मिकॉबर नांवाच्या माणसाच्या तोंडून वदवितो, तरी ते शहाणपणाचे आहेत ) – “माणसाचें वार्षिक उत्पन्न २० पौंड असलें, व खर्च १९ पौं. १९ शि. ६ पे. असला तर त्याला सुख होतें. उत्पन्न २० पौंड, व खर्च २० पौं. ० शि. ६ पे. असला तर परिणाम दुःखे." आणि पाहूं गेलें तर अंतर काय तें एका शिलिंगाचें.
 कर्ज ह्मणजे गुलामगिरी असें झटलें तर अतिशयोक्ति होत नाहीं. " जो कर्ज काढितो तो दुःखांत पडतो. " आयुष्यांतील पुष्कळ गोष्टी आवडण्याजोग्या नसतात. हॉरेस ग्रीली ह्याला ज- गाचा अनुभव फार होता. त्यानें हाटलें आहे तें वाजवी व खरें आहे. तें असें–“क्षुधा, थंडी, फाटकीं चिरगुटें, मेहनतीचें काम,


१ डेव्हिड कापरफील्ड.